Marathi e-Batmya

१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक तारखा जाहिर

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरु असून आहे. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांकडून महापालिका निवडणूका जिंकण्याची तयारीत आहे. महापालिका निवडणूकीसाठीचा प्रचार आज संपत असून मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला.

राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सदर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला.

यावेळी बोलताना राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यापेक्षा कमी आरक्षण आहे. अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणूका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये निवडणूका घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणूका जाहिर
पुणे विभागः- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोल्हापूर, सोलापूर
कोकण विभागः-रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मराठवाडा विभागः-छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर

दिनेश वाघमारे पुढे बोलताना म्हणाले की, जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत प्रत्येक मतदाराला दोन मतं देणं बंधनकारक आहे. त्यातील एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि एक मत पंचायत समिती गणासाठी एक मत देण्यासाठी द्यावं लागणार आहे. तसेच या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविली जाणार असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे…
अधिसूचनाः- १६ जानेवारी रोजी
उमेदवारी अर्जः- १६ ते २१ जानेवारीचा कालावधी
उमेदवारी अर्जाची छाननीः- २२ जानेवारी २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीखः-२७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत
अंतिम यादी व चिन्ह वाटपः- २७ जानेवारी दुपारी ३.३० नंतर
मतदानः- ५ फेब्रुवारी रोजी पार पडणार
मतमोजणीः-७ फेब्रुवारी रोजी

Exit mobile version