Marathi e-Batmya

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत या उमेदवारांचे बंड झाले थंड

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी राज्यातील जवळपास सर्वच पक्षाकडून उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड करत अपक्ष आमदार म्हणून उमेदवारी अर्ज भरला. परंतु या बंडखोर उमेदवारांमुळे विधानसभा निवडणूकीत दरम्यान डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचा परिणाम पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या मताधिक्यावर होणार असल्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या बंडखोर उमेदवारांचे थंड करण्याचा एकमेव पर्याय पक्षनेतृत्वासमोर होता. अखेर बंडखोरांचे म्हणणे ऐकून घेत विधान परिषदेच्या पाच जागांपैकी एका जागेवर वर्णी लावण्याचे, आर्थिक विकास महामंडळाचे गाजर दाखवित अनेक उमेदवारांचे बंडखोरांचे बंड करण्यात राजकिय पक्षाच्या नेत्यांना यश आले आहे.

मात्र सध्या चर्चेत असलेल्या जागांपैकी माहिम-दादर विधानसभा मतदारंसघातून अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे पक्षाचे सदा सरवणकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे गेले. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना भेटण्यास नकार दिला. त्यामुळे या मतदारसंघात मनसेच्या अमित ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाचे महेश सावंत आणि शिवसेना शिंदे पक्षाचे सदा सरवणकर यांच्यात तिरंगी सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच सदा सरवणकर यांची उमेदवारी कायम राहिली.

याशिवाय बोरिवली विधानसभा मतदारसघातून गोपाल शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकाही झाल्या होत्या. मात्र पक्ष हितासाठी काहीही करेन म्हणणारे गोपाळ शेट्टी ही निवडणूक मैदानातून माघार घेणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गोपाल शेट्टी यांनी शेवटच्या क्षणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात लढायचे नसल्याचे सांगत उमेदवारी मागे घेतली.

तर महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांनी नांदगाव मधून विद्यमान शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला असून तो त्यांनी कायम ठेवला आहे.

मात्र शिवसेना उबाठा आणि काँग्रेसकडून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. शिवसेना उबाठाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. तर काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. मात्र या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

तसेच अंधेरी पूर्व मधून एनकांऊटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मा यांच्या पत्नी स्विकृती शर्मा यांनीही शिंदे शिवसेना पक्षात बंडखोरीचा झेंडा उभारला होता. तसेच उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या बंडखोरांची यादी खालील प्रमाणेः-

मधुरिमाराजे- काँग्रेस, कोल्हापूर उत्तर विधानसभा

गोपाळ शेट्टी- भाजपा, बोरीवली

स्विकृती शर्मा- शिवसेना शिंदे गट, अंधेरी पूर्व

सुरज सोळुंके- शिवसेना शिंदे गट, उस्मानाबाद

मकरंदराजे निंबाळकर- शिवसेना ठाकरे गट, उस्मानाबाद

विजयराज शिंदे- भाजप, बुलढाणा

किशोर समुद्रे- भाजप, मध्य नागपूर

जयदत्त क्षीरसागर- अपक्ष बीड

जगदीश धोडी- शिवसेना शिंदे गट, बोईसर

अशोक भोईर- बहुजन विकास आघाडी, पालघर

अमित घोडा- भाजपा, पालघर

तानाजी वनवे- काँग्रेस, नागपूर पूर्व

तनुजा घोलप- अपक्ष, देवळाली

मदन भरगड- काँग्रेस, अकोला

प्रशांत लोखंडे- शिवसेना शिंदे गट, श्रीरामपूर

सुहास नाईक-काँग्रेस, शहादा तळोदा

विश्वनाथ वळवी- काँग्रेस, नंदुरबार

सुजित झावरे पाटील- अजित पवार गट, पारनेर

जिशान हुसेन- वंचित बहुजन आघाडी, अकोला

नाना काटे- अजित पवार, चिंचवड

बाबुराव माने- शिवसेना ठाकरे गट, धारावी

मधू चव्हाण- काँग्रेस, भायखळा

विश्वजीत गायकवाड, भाजपा, लातूर

संदीप बाजोरिया- शरद पवार गट, यवतमाळ

हेमलता पाटील- काँग्रेस, नाशिक मध्य

उदय बने- शिवसेना ठाकरे गट, रत्नागिरी

अंकुश पवार- मनसे, नाशिक मध्य

राजेभाऊ फड-अजित पवार गट, परळी

कुणाल दराडे- शिवसेना ठाकरे गट, येवला

जयदत्त होळकर- शरद पवार गट, येवला

किरण ठाकरे- भाजप, कर्जत खालापूर

रुपेश म्हात्रे- शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष-भिवंडी पूर्व

संगीता वाझे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-मुलुंड

मिलिंद कांबळे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-कुर्ला

अविनाश लाड-काँग्रेस-रत्नागिरी

प्रतिभा पाचपुते- भाजपा, श्रीगोंदा

दिलीप माने- काँग्रेस, सोलापूर

अविनाश राणे- शिवसेना शिंदे गट- अणुशक्तीनगर

संगिता ठोंबरे- भाजपा, केज

राजू परावे- शिवसेना शिंदे गट- उमरेड

अब्दूल शेख- अजित पवार गट- नेवासा

धनराज महाले- शिवसेना शिंदे गट, दिंडोरी

शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे- भाजपा, सांगली

रणजीत पाटील- शिवसेना ठाकरे गट- परंडा

नरेश अरसडे- अजित पवार गट- काटोल

सुबोध मोहीते- अजित पवार गट- काटोल

राजश्री जिचकार- काँग्रेस- काटोल

वृषभ वानखेडे- आम आदमी पार्टी- काटोल

संदीप सरोदे- भाजपा- कोटोल

Exit mobile version