Marathi e-Batmya

उदयनराजें म्हणाले की, राज्यपालांच्या त्या वक्तव्याने…

औरंगाबादेत काल आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रामदास स्वामींशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यात नव्याने वादंग निर्माण झाले. यापार्श्वभूमीवर विविधस्तरातून राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ प्रतिक्रिया उमटत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १६ वे वंशज छत्रपती उदयन राजे भोसले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू राष्ट्रमाता जीजाऊ होत्या असे सांगत या राज्यपालांच्या वक्तव्यांने भावना दुखावल्याची प्रतिक्रियाही ट्विटद्वारे व्यक्त केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. आता खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील ट्विट करत भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. यात उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु राष्ट्रमाता जिजाऊ होत्या, असे स्पष्ट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी हे वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याचेही त्यांनी व्यक्त केले.

राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत राज्यपालांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी केली.

Exit mobile version