मुंबई-अचलपूरः प्रतिनिधी
हिंगणघाट येथील दरोडा गावातील एका प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडीतेचा आज अखेर मृत्यू झाला. या पीडीतेच्या मृत्यूने संबध महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून तिच्या नातेवाईकांना १० लाख रूपयांची मदत राज्य सरकारच्यावतीने मंजूर करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
या प्रकरणातील आरोपी नगराळे याच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
हिंगणघाटमधील पीडीतेला सरकारकडून १० लाखाची मदत
