Marathi e-Batmya

विधानमंडळ सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ

महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार स्वीय सहाय्यकांचे मासिक मानधन ३० हजार रुपयांवरून ४० हजार रुपये, तर वाहनचालकांचे मासिक मानधन २० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्यात आले आहे. ही वाढ १ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आली असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९५६ मधील तरतुदींनुसार विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांना त्यांचे विधिमंडळाचे प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी स्वीय सहाय्यकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.

विधानमंडळ सदस्यांच्या वेतन व भत्ते संयुक्त समितीच्या शिफारशीनुसार स्वीय सहाय्यकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version