Marathi e-Batmya

महाराष्ट्र मॅग्नेटीक नाही तर पथेटीक झाला

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारने मँग्नेटीक महाराष्ट्रच्या गुंतवणूकीचे आयोजान केले. मात्र वास्तविक मध्ये महाराष्ट्र हे मँग्नेटीक राज्य नाही तर पथेटीक राज्य झाल्याचा टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी करत राज्यातील गुंतवणूकीचे खरे चित्र दाखविण्यासाठी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आझाद मैदानालगत असलेल्या काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एकीकडे भव्य दिव्य इव्हेंट तर दुसरीकडे खोटी आकडेवारी फसव्या घोषणा यांचा भडीमार राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप करत राज्य सरकारचा कारभार हा असंवेदनशील कार्यपध्दती, चुकलेल्या प्राथमिकता, मंत्रालयात येऊन शेतक-यांनी आणि सुशिक्षित बेरोजगारांनी केलेले आत्महत्येचे प्रयत्न असा काळाकुट्ट अंधार महाराष्ट्रात पसरलेला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Exit mobile version