औरंगाबादः प्रतिनिधी
मी मराठवाड्याचा भूमीपूत्र असून आमदार असतांनाही मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजवंदनाला हजर राहात होतो. मला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आनंदाने आणि जल्लोषात साजरा करायला आवडेल अशी ग्वाही खा. इम्तीयाज जलील यांनी दिली.
आम्हाला जनता रझाकार समजते, आम्ही रझाकार संघटनेचे प्रमुख कासीम रझवी यांना मानतो. या ७० वर्षांपूर्वीच्या घटना आहेत. आता काळ बदलला, माणसे बदलली आणि मी औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासा संदर्भातच काम करणार आहे. जर कोणाच्या मनात एम.आय.एम. विरुध्द गैरसमज असतील तर ते काढून टाकावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. रझाकारांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा संवैधानिक बदला घेतला. या वक्तव्याशी आपण आजिबात सहमत नाही. मराठवाडा मुक्तीसंग्रामात शहीद झालेल्या व त्या स्वातंत्र्य संग्रामातील मान्यवरांच्या वंशजांनी मला शहर आणि जिल्ह्याच्या विकासासंदर्भात मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा बाळगत असल्याचे ते म्हणाले.
श्रीलंकेतील बुरखा बंदी भारतातही आणावी या मताचे आपण नसून एखादी घटना घडल्यानंतर राज्यकर्ते त्या ठिकाणी काही निर्णय घेत असतात. त्याची पुनरावृत्ती सर्वच ठिकाणी होणे याला अर्थ नसतो. अफवा उठवून वातावरण खराब करण्यापेक्षा शहर आणि जिल्ह्याचा विकास कसा करावा या बाबत मी जनतेकडून सूचना आणि मार्गदर्शनाची नेहमीच अपेक्षा ठेवणार आणि अपेक्षापूर्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन जल्लोषात साजरा करणार
