Marathi e-Batmya

गिरणी कामगारांच्या घरांसाठी पनवेल येथे जागा

नागपूरः प्रतिनिधी
मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा आहे. त्यादृष्टीकोनातून शहरातील ३८ गिरण्यांच्या जमिनीवर २४ हजार घरे तर उरलेली पनवेल येथील कोन गाव येथे पर्यायी जागा उपलब्ध असल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
विधानसभेत विचारण्यात आलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.
गिरण्या बंद झाल्यानंतर त्या जागांवर उभारलेल्या इमारतींमध्ये गिरणी कामगारांना घरे देण्यात आली. आतापर्यंत दोन टप्प्यात गिरणी कामगारांसाठी ९,५५९ घरांची सोडत काढण्यात आली असून श्रीनिवास मिल आणि बॉम्बे डाईंग (स्प्रिंग मिल) वर ३,८३५ घरे बांधण्यात येत आहेत. मुंबई शहरात ३८ गिरण्यांच्या जागेवर २४,६०० घरे बांधणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय उर्वरित घरे ही शहरा बाहेर बांधण्याची व्यवस्था केली जाईल. यासाठी पनवेल येथील कोन गाव येथे पर्यायी जागा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version