Marathi e-Batmya

खासदार नवनीत राणांचा सवाल, आम्ही कधी उद्धव ठाकरेंचा रिपोर्ट मागितला का?

रूग्णालयातील एमआरए काढताचे नवनीत राणा यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला नेत्यांनी आज वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात जावून रूग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत एमआयआर स्कॅन करताना फोटो काणी काढला असा सवाल केला. यासंदर्भात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन वर्षापासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मंत्रालयात गेले नाहीत म्हणून आम्ही कधी त्यांचा रिपोर्ट मागितला का? असे खोचक प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या महिला नेत्यांना केला.
नवनीत राणा या नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयाच्या एमआयआर कक्षातील फोटो समोर आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्यांनी सोमवारील लीलावती रुग्णालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरु असताना फोटो कोणी काढला असा सवाल शिवसेना नेत्यांनी उपस्थित केला. याबबात पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती आमदार मनिषा कायंदे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता असल्याने गैरवापर केला जात आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या घरावर कारवाई करण्यात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या लीलावतीमधील बाकीच्या रुग्णांच्या घराचीही मोजमापणी करु शकतात असा टोला लगावत लीलावती रुग्णालय तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले तर नवल वाटणार नाही. कारण त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण रुग्णालापर्यंत पोहोचले असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
मी लीलावतीमध्ये एमआरआय केला आहे. दोन वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत म्हणून आम्ही कधी उद्धव ठाकरेंचा रिपोर्ट मागितला का? आधी त्यांनी त्यांचे रिपोर्ट द्यावे मग मला रिपोर्ट मागावा. मी सर्व रिपोर्ट पुराव्यासह देईन. कोणाच्या खासगी रिपोर्ट मागणे सरकारचे काम नाही असेही त्या म्हणाल्या.
शिवसेना नेते लिलावती रुग्णालयात जाऊन धडकले होते. त्यांनी रुग्णालय प्रशासनास विविध प्रश्न विचारून जोपर्यंत याचे उत्तर दिले जात नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयातून हलणार नसल्याची भूमिका घेतली होती. नवनीत राणा यांचा खरच एमआरआय झाला आहे का?, एमआरआय करताना फोटो कसे काढले गेले? रुग्णलायाचे नियम सर्वांना समान हवेत अशी मागणी करत राणांच्या तपासण्यांचा रिपोर्ट मिळेपर्यंत आम्ही जाणार नसल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.

Exit mobile version