Marathi e-Batmya

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोविड परिस्थितीमुळे अंतिम वर्षाच्या परिक्षेसह अनेक परिक्षा रद्द करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला. मात्र स्पर्धा परिक्षांबाबत सातत्याने तारखा नव्याने जाहीर करण्यात येत होत्या. त्यामुळे या परिक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सतत संभ्रमावस्था निर्माण होत होती. त्यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.

त्यामुळे पुढील काही दिवस विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्र लोकसेवा आयगोच्या परिक्षांबाबत संभ्रमावस्था राहणार नाही. पुढे ढलण्यात आलेल्या सर्व परिक्षांचे सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version