Marathi e-Batmya

मस्वापचे अध्यक्ष नारायण राणे यांची धनंजय मुंडे यांना तंबी

औरंगाबाद : प्रतिनिधी

ज्या भाजपने राणेंचा स्वाभिमान जपला नाही. त्यांनी पक्ष काढून काय उपयोग अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्या टीकेचा समाचार घेत मस्वापचे अध्यक्ष नारायण राणे म्हणाले की ? धनंजय मुंढे यांनी माझ्याविषयी नीट बोलावे अशी तंबी देत त्यांनी भलते सलते बोलणे ही त्यांची योग्यता नसल्याची टीका राणे यांनी केली.

औरंगाबादेत भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या पकोडा आंदोलनासाठी आज दुपारी २ वा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी राणे यांच्याबाबत विचारले असता त्यांनी वरील टीका केली. त्या टीकेचे मनावर घेत नारायण राणे यांनी धनंजय मुंडे यांना तंबी देत त्यांची योग्यता नसल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना शिवसेनेने पाठींबा काढला तरी सरकार पडत नाही. त्यामुळे भाजपने शिवसेनेला घाबरण्याचं कारण नसल्याचा मित्रत्वाचा आणि धीराचा सल्ला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नारायण राणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.

महाराष्र्ट स्वाभिमान पक्ष नावाचा नवा राजकिय पक्ष काढल्यानंतर औरंगाबादेत दुसरी जाहिर सभा घेण्यासाठी राणे आले होते. पहिली सभा कोल्हापूरला झाली. तर यानंतर सोलापूरात सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रविवारी बीड आणि जालना जिल्ह्यात अचानक झालेल्या गारपीटग्रस्त भागाचा दौरा आपण करणार असल्याचे सांगत दोन आठवड्यात नव्या राजकिय पक्षाची अधिकृत नोंदणी पूर्ण होईल त्यानंतर पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्पा करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. राष्ट्रवादी काँगेस, भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस या चारही पक्षांपेक्षा वेगळं काम करुन जनतेचा विश्र्वास संपादन करण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण नवा पक्ष स्थापन केल्याचे राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न होणे फडणवीसांसोबत राजकीय खेळी खेळली जात असल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला.

शेतकरी धर्मा पाटील व आरोपी हर्षल रावते यांचे मंत्रालयातील आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच  मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधील  रामगिरी निवासस्थानासमोर महापालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. कर्मचाऱ्यांना २००२ मध्ये नोकरीवरुन काढले होते. त्यानंतर पुन्हा कामावर न घेतल्याने शनिवारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता.

Exit mobile version