मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कॉग्रेस पक्षात विलीन होणार या बातम्यांमध्ये तथ्यता नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.
गुरुवारी दहा जनपथ येथे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर देशात उलटसुलट बातम्यांचे पेव फुटले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कॉग्रेस पक्षात विलिन करणार अशा होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूक आणि राज्यात पडलेला भीषण दुष्काळ यावर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षात विलीन करणार हे वृत्त तथ्यहीन
