Marathi e-Batmya

राष्ट्रवादीची मुंबईची जबाबदारी नवाब यांच्याकडे तर नवी मुंबईची अशोक गावडेंकडे

मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी आपल्या पदाचा राजीनामा न देताच थेट शिवसेनेत उडी मारली. त्यामुळे रिक्त झालेल्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नवी मुंबईच्या जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी अशोक गावडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.
नवीमुंबई जिल्हा अध्यक्षपदी अशोक गावडे यांच्यासह जिल्हा निरीक्षक पदी प्रशांत पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.

Exit mobile version