Marathi e-Batmya

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार सहकुटुंब पोहोचले दिल्लीतल्या घरी

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पवार कुटुंबात पडलेल्या राजकिय फूटीच्या पार्श्वभूमीवर विविध तर्क वितर्क लढविले जात होते. तसेच पवार कुटुंबात अंतर्गत कलह वाढला असल्याचेही सांगण्यात येत होते. परंतु शरद पवार यांच्या आज ८५ व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा महाजन, पार्थ पवार आदी सर्वजण शरद पवार यांचे दर्शन घेण्याकरीता सीनिअर अर्थात शरद पवार यांच्या घरी पोहोचले.
यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, आमदार छगन भुजबळ आदी नेतेही यावेळी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी शरद पवार यांचे अभिष्टचिंतन करत त्यांचे आर्शिवादही घेतले. मात्र अजित पवार आज सहकुटुंब आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्यासोबत शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने राजकिय वर्तुळात सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

या भेटीनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे. तर काकींचा वाढदिवस आहे. त्यांच्या दर्शनासाठी आम्ही आलो. साधारणतः सध्या काय घडामोडी सुरु आहे यावर चर्चा झाली. परभणीला काय घडलं आदी विषयावर चर्चा झाली. लोकसभा-राज्यसभेत काय सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी, विधिमंडळ अधिवेशन कधी सुरुवात आदी विषयांवर चर्चा झाल्याचं सांगितलं.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत पवार कुटुंबात झालेल्या आरोप-प्रत्यारोपावर विचारले असता अजित पवार म्हणाले की, राजकारणात टिका-टिपण्ण्याच असतात. मात्र त्या पलिकडेही संबध असतात ना असे स्पष्ट करत यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं ते शिकवलं आहे. त्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version