Breaking News

प्रविण दरेकर यांची टीका, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ संजय राऊत बघताहेत मलिन झालेली प्रतिमा सावरण्यासाठी राजीनामा देणे केजरीवालांची स्टंटबाजी

भ्रष्टाचारामुळेच अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले. त्यांच्या मते जो चेहरा जनतेत दाखविण्याचा होता तो बुरखा फाटलेला आहे. अशावेळी आपली प्रतिमा जनतेच्या मनात मलिन झालीय ती पुन्हा सावरण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न आपल्या स्टाईलप्रमाणे केजरीवाल करू इच्छित असल्याची टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली.

पत्रकारांशी संवाद साधताना प्रविण दरेकर यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करताना म्हणाले कि, उद्धव ठाकरे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत योजना कशी लागू करतात. त्याकरिता बजेट कसे करावे, सरकार कसे चालवावे हे ज्यांना समजले नाही. सरकार ज्यांना टिकवता आले नाही, स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्री हाताळता आले नाही, आमदार हाताळता आले नाहीत ते जनतेचे प्रश्न काय हाताळणार. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ संजय राऊत बघताहेत तेच त्यांचे प्रमुख उद्धव ठाकरे बघताहेत. सरकार महायुतीचेच येणार. त्यामुळे कुणीही अशा प्रकारच्या स्वप्नात राहू नये. स्वप्नात रममाण व्हायचे असेल तर त्यांना मोकळीक आहे.

प्रविण दरेकर पुढे म्हणाले कि, विरोधी पक्ष भयभीत झालेला आहे. ज्यापद्धतीने महायुती सरकारला जनतेचा प्रतिसाद मिळतोय, ज्या योजना मग लाडकी बहीण असेल, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, सोयाबीन-कापूस निर्यातबाबत घेतलेला निर्णय असेल यामुळे जनमाणस पूर्णपणे बदलला आहे. आता विरोधक संभ्रमित, भयभीत झालेत. कुठल्याही प्रकारची गोष्ट आम्ही अजेंड्यात आणू हे येणाऱ्या काळात ते सांगताना दिसतील. कारण कर्नाटकला अशाच प्रकारे नको त्या घोषणा केल्या नंतर त्याची अंमलबजावणी झाली का? याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे असा टोलाही यावेळी लगावला.

कर्नाटकात हिंसेनंतर पोलिसांनी गणपतीची मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये ठेवली. त्यावरून प्रविण दरेकरांनी टिकास्त्र सोडताना म्हणाले कि, काँग्रेसचे आपल्या देव-दैवतांच्या किंवा हिंदुत्वाच्या संबंधात मनात काय दडलेय हे कर्नाटकच्या त्यांच्या वागण्यातून जो काही अत्याचार केला त्यावरून दिसून येतेय. गणपती बाप्पा आपण आपले दैवत समजतो, मंदिरात, मखरात ठेवतो त्याला आरोपीसारखे पिंजऱ्यात या लोकांनी ठेवले. हे योग्य आहे का? याचे महाराष्ट्रातील काँग्रेसने उत्तर द्यावे. नाहीतर गणेशभक्तांची, हिंदुत्वप्रेमिंची जाहीर माफी मागावी अशी मागणीही केली.

प्रविण दरेकर पुढे म्हणाले कि, नितीन गडकरी हे संघाच्या मुशीतून स्वयंशिस्तीचे कार्यकर्ते, नेते आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेत. वरिष्ठ नेतृत्वापैकी महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना ना कोणी प्रभावित करू शकत, ना त्यांना दबाव टाकण्याची आवश्यकता आहे. गडकरी मोठे नेते आहेत हे निर्विवाद सत्य आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली काम करताहेत. मोदींच्या ऐवजी पंतप्रधान व्हावे अशी त्यांनी कधी इच्छा व्यक्त केली नाही. पंतप्रधान मोदींचा झंझावात रोखण्यासाठी विरोधी पक्ष ऑफर देऊ शकतं. गडकरी पंतप्रधानांन एवढेच ताकदवान अशा प्रकारचे नेते आहेत हे निर्विवाद सत्य आहे असेही यावेळी सांगितले.

भुजबळ यांनी केलेल्या विधानाला दुजोरा देत प्रविण दरेकर म्हणाले कि, विधिमंडळात मी राजेश टोपे, रोहीर पवार यांच्यावर जाहीर आरोप केला आहे. सरकारने जर चौकशी केली तर यामागे कोण खतपाणी घालतेय, आगीत तेल ओततेय हे समोर येईल. रोहित पवारची सोशल मीडिया टीम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडद्याआड असणाऱ्या काही मराठा संघटना आणि राजेश टोपे तेथील शरद पवारांचा स्थानिक नेता शंभर टक्के या विषयाच्या मागे आहेत असा आरोपही केला.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना प्रविण दरेकर म्हणाले कि, आपले भाऊ कुठे आहेत, आपल्यापासून का दुरावलेत याचे आत्मपरीक्षण करा. भाऊबंधकी आणि कुटुंब यासंदर्भात उद्धव ठाकरे बोलूच शकत नाहीत. महाराष्ट्राने ठाकरे परिवार, मातोश्री कुटुंबाचे काय झालेय हे पाहिलेय.

पवारांना मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी कणव नव्हती

प्रविण दरेकर म्हणाले कि, चंद्रकांत पाटील यांचे अत्यंत योग्य असे वक्तव्य आहे. ५० वर्ष शरद पवार राजकारणात आहेत. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेत. अनेक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री होते. का पवारांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. उलटपक्षी ९४ साली जे १६ टक्के आरक्षण होते ते देऊन आरक्षणाची मर्यादा ५० टक्केपर्यंत नेऊन ठेवली. का त्यांना वाटले नाही हे आरक्षण ठेवले नाही जर ते खाली ठेवले असते तर आज मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ५० टक्क्याच्या वर मर्यादा गेली नसती. खऱ्या अर्थाने पवारांना कधीच मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी कणव नव्हती. ते फक्त नावाला, राजकारणासाठी मराठा समाजाचा उपयोग करायचे. मराठा समाजासाठी त्यांनी कधीच भुमिका घेतलेली नाही. स्पष्टपणे मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही एवढंही सांगण्याचे धाडस केले नसल्याची टीका केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत