Marathi e-Batmya

राहुल गांधी यांचे उद्विग्न प्रतिपादन, … खाती गोठविल्याने खर्चायला दोन रूपये सुध्दा नाहीत

देशातील लोकशाही धोक्यात आली असून एकही सरकारी यंत्रणा तिचे कर्तव्य बजावताना दिसत नाही. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून सर्व राजकिय पक्षांना निधी मिळाला. परंतु भाजपाने कोणकोणत्या माध्यमातून निवडणूकीचा निधी मिळवला याचा इतिहास जगजाहिर आहे. परंतु भाजपाने आयकर विभाग, ईडीच्या माध्यमातून काँग्रेसची विविध बँकांमधील खाती गोठविल्याने आज लोकसभा निवडणूक प्रचारासाठी, नेत्यांच्या प्रवासासाठी आणि उमेदवारांना मदत म्हणून पैशाच्या स्वरूपात मदत देता येणार नाही. तसेच कोणत्याही माध्यमांतून प्रचार करण्यासाठी आता २ रूपये सुध्दा नसल्याचे उद्विग्न उद्गार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढले.

काही महिन्यापूर्वी इलेक्टोरल बॉण्डप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका सुनावली घेत असतानाच केंद्रातील भाजपा सरकारने काँग्रेस पक्षाची अखिल भारतीय काँग्रेस, अखिल भारतीय महिला काँग्रेस, राष्ट्रीय विद्यार्थी संघटना अर्थात एनएसयुआय या प्रमुख चार संघटनांची खाती आयकर विभागाने गोठविली आहेत. यावरून काँग्रेसने केंद्र सरकारच्या आदेशानुसार आयकर विभागाने नोटीस बजावत ही खाती गोठविण्यात आली आहेत.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्षाची बँक खाती फक्त गोठविली. परंतु एकही प्रशासकिय संस्था केंद्रीय निवडणूक आयोग, प्रसारमाध्यम आणि इतर कोणत्याही संस्था त्यावर काहीच बोलायला तयार नाहीत. निवडणूकीतील प्रचारापासून रोखण्यासाठी जाणीवपूर्वकच काँग्रेसची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. परंतु ही बँक खाती फक्त काँग्रेसचीच नाही तर देशाच्या लोकशाहीची खाती गोठविण्यात आली आहेत असा गंभीर इशाराही यावेळी दिला.

यावेळी बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, आम्ही देशाची लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्यासाठी आम्ही लढा पुकारला आहे. परंतु ऐन निवडणूकीत काँग्रेस पक्षाला प्रचारासाठी पैसै खर्च करण्यासाठी उपलब्ध होऊ नये, काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मदत देता येऊ नये म्हणून तसेच काँग्रेसच्या प्रचारासाठी टीव्ही आणि वर्तमानपत्रात जाहिराती देता येऊ नये या उद्देशाने कोणत्या तरी जून्या एका प्रकरणाचा संदर्भ देत काँग्रेस पक्षाची बँक खाती आयकर विभागाने गोठविली आहेत. बरं हा बँक खाती गोठविण्याची वेळ पाहिली तर देशातील निवडणूकीच्या कालावधीचा आहे. जेणे करून प्रचारात काँग्रेस कुठेच दिसू नये यासाठी ही बँक खाती गोठविण्यात आली आहे. मग अशा या स्थितीत निवडणूका पारदर्शी आणि लोकशाही तत्वानुसार होतील असा सवाल निवडणूक आयोगाला केला.

यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या ही म्हणाल्या की, काँग्रेसला निवडणूकीच्या प्रचारात उतरू न देण्यासाठीच आयकर विभागाने काँग्रेसची खाती गोठविली आहेत. भाजपाला देशातील लोकशाही संपवून त्यांना हुकूमशाही पध्दत आणायची आहे. त्यामुळेच भाजपाकडून जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाची आणि संबधित संघटनांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत असेही यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकन म्हणाले की, काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले स्व.सीताराम केसरी यांच्या काळात आयकराचा भरणा केला नसल्याच्या मुद्यावरून आयकर विभागाने मागील सात वर्षापासून काँग्रेसची खाती गोठविली आहेत. त्यानंतर आता आठवडाभरापूर्वी आयकर विभागाने नोटीस बजाविली आहे. तसेच त्याचा खुलासा मागविला आहे. सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष असलेले त्याला २५ ते ३० वर्षे झाली आहेत. तसेच १४ कोटी रूपयांचा हिशेब लागत नाही म्हणून काँग्रेसच्या बँक खात्यात असलेली २२५ कोटी रूपयांचा दंड ठोठावण्याचा अजब प्रकार करत तो बँक खात्यातील निधीही परस्पर काढून घेतल्याचा आरोप केला. लोकसभा निवडणूकीपासून आम्हाला वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. बरं जरी आम्ही आयकर विभागाने आयकराचे विवरण पत्र दाखल करण्यास एक महिन्याचा उशीर झाला तर त्यास नियमाप्रमाणे १० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात येतो. परंतु काँग्रेसला ठोठावलेला दंड हा ११० टक्के जास्तीचा असल्याचा दावाही केला.

 

Exit mobile version