अपघात आहे की घातपात हा प्रश्न कायम त्यात राहतो. घातपाताच्या दिशने जाण्याचा प्रवास सुरु झालाय. २७ तारखेला कोणं भेटायला आलेलं. फोन कोणाचा आलेला हे मुद्दे होते. संध्याकाळी ६.५० ते ७.०५ मिनिटापर्यंत फोनवर बोलणं झालं, एवढीच अपडेट देतो,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की,विमान जेव्हा मुंबईवरून बारामतीला गेलं तेव्हाच ते फ्यूल टँक भरले होते. पण मग फ्यूल टँक पूर्ण भरायची गरज नव्हती. बारामतीला दादांना सोडल्यावर विमान पुढे जाणार होतं, मग पुढे हैद्राबादला जाऊन विमानात इंध भरता आलं असतं ना. कोणी असं म्हणेल की महाराष्ट्रात इंधन स्वस्त असतं, म्हणून भरलं असेल तर कोणी असं म्हणेल की इथल्यापेक्षा गुजरातमध्ये त्याहीपेक्षा स्वस्त होतं , त्यामुळे विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय ? असा सवालही उपस्थित केला.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की,एखादा बॉल जर मातीत पडला तर तो कमी आदळतो, पण तो टणक रस्त्यावर पडला, जास्त आदळू टप्पे घेतो. आपण जर अपघात स्थळी पाहिलं तर अजित दादाचं जे विमान होते, कडक सरफेसवर पडलं, रनवेवर पडलं नव्हतं. तर एका साईडला पडलं होतं. त्यामुळे ते जोरात आदळलं. आता त्यांच्या विमानाचा स्फोट का झाला याबद्दल शंका घेतली जात, त्याचं मुख्य कारण, याबद्दल काही शंका व्यक्त करण्यात येत आहे. ती खरी ठरताना दिसत आहेत. अजित दादांच्या त्या विमानात जे फ्यूल टँक होते, ते अधिकचे होते. खरंतर विमानात टॉयलेटच्या बाजूला फ्यूल टँक असतात. त्याच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
रोहित पवार म्हणाले की,व्हीएसआर कंपनीच्या बाबतीत, मेन्टेन्सच्या बाबतीत दाखले दिले होते. बरेच तज्ञ त्या विषयात बोलताना दिसतात. आता जो व्हिडिओ आला त्यात पाहिलं की अधिकचे स्फोट झाले. ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात अशी शक्यता व्यक्त केली जात होती की, व्हॉइस रेकॉर्डर नाही अशी कारणं पुढे येऊ शकतात. कालच त्या बाबत सरकारच्या एजन्सीकडून स्पष्टीकरण आलं आहे,विमानातील ब्लॅकबॉक्स जळाला, असं सांगण्यात येत आहे. खरं सांगायचं झालं तर ११०० डिग्री सेल्सिअस असताना, तिथे १ तास ब्लॅक बॉक्स पडला असेल तरच तो थोडा डॅमेज होतो, असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. जर सहा हजार मीटर खोली पर्यंत पाण्याचं प्रेशर असेल तर अशा परिस्थितीतसुद्धा विमानातला ब्लॅक बॉक्स टिकू शकतो. विमान पडलं तिथे बरेच कागद होते, पण ते कमी जळले. स्फोटाचा धक्का काही सेकंदाचा असतो. त्यामुळे कागद जळत नाही, असेही . यावेळी सांगितले.
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की,अकाऊंटेबल मॅनेजरचं नाव साईटवरून डीलिट केलं. त्याचा इंटरव्ह्यू डीजीसीने घेतला. ही माणसं कुठे आहे. त्यांची चौकशी केली का. डीजीसीएने काल जी नोटीस दिली त्यात सीसी अकाऊंटेबल मॅनेजर लिहिलं. पण तो कुठे आहे. जेट चालवत असाल तर लेगसीचं विमान चालवता येत नाही. पण पायलट कपूर हे दोन्ही विमान चालवत होता. नियमानुसार ते चुकीचं आहे. डीजीसीला सांगायचं की कागदं रंगवू नका. कागदाच फरक दिसला तर योग्य ठरणार नाही, असेही रोहित पवार बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, या अपघातामागे विम्याचं कारण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. VSR च्या विमानाची किंमत ३५ कोटी आहे. पण त्याची क्वॉलिटी पाहिली तर ते फक्त १० ते १५ कोटीला विकल्या जाऊ शकलं असतं. १० कोटीच्यावर हे विमान गेलं नसतं असं काही लोकांनी सांगितलं. ५५ कोटी रुपयांचा विमा होता. लाएबिलीटी विमान होती २१० कोटी. त्यात पायलटही आले. पाचही जण आले. मेन पायलटला किती रुपये मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ही गोष्ट पायलटला माहीत होती का याचं स्पष्टीकरण मिळायला हवं, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.
शेवटी बोलताना रोहित पवार म्हणाले की,काही लोकं यात राजकारण आणि मैत्री आणत आहेत. यात मोठे इन्व्हेस्टर आहेत. त्यात मी जाणार नाही. शेकडो कोटींची गुंतवणूक आहे. त्यामुळे कंपनीला वाचवलं जात आहे. १०० ते २०० कोटीसाठी कंपनीला वाचवू नका, अशी माझी इन्व्हेस्टरांना विनंती आहे. नाही तर आम्ही शांत बसणार नाही. आमचा काका त्यात गेला आहे. सुमित कपूर यांना दारू प्यायची सवय होती. जेटमध्ये त्यांचा पगार १० ते १२ लाख होता. पाच वर्ष ते बिना पगाराचे होते. त्यानंतर लेअर जेटमध्ये त्यांना संधी दिली. त्यानंतर लेअर जेटमध्ये आल्यावर त्यांना ३ लाख रुपये पगार आला. प्रत्येक फेरीचा २५ हजाराच्या आसपास होते. त्यामुळे हा पगार ६ लाखावर आला होता. ते डिप्रेशनमध्ये होते. व्यक्तिगत एका विषयाने ते डिप्रेशनमध्ये होते. त्याचा गैरफायदा घेऊन त्यांना ब्लॅकमेल केले का? याची चौकशी झाली पाहिजे.
