मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आज काही रक्कम जमा करण्यात आली असून सध्या एक महिन्याचे वेतन साधारणतः एका तासाभरात त्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे. तर उर्वरित थकित पगारीसाठी बँकेकडे आणि इतर वित्तीय संस्थांकडे कर्ज घेण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरु असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
सध्या एस.टी. बसेसना प्रवाशीच नसल्याने महामंडळाला उत्पन्नाचे स्त्रोत राहीले नाही. त्यामुळे त्यांना पगारी देण्यासाठी निधीही उपलब्ध होत नाही. यापार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना काही महिने पगार देण्यासंदर्भात राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारकडेच पुरेसा निधी येत नसल्याचे सध्या तरी दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे लगेच तर उर्वरित वेतन लवकरच
