Marathi e-Batmya

आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा, बिनविरोध निवडणूक झालेल्या ठिकाणच्या या गोष्टी तपासणार

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूकीची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. मतदानाला अवकाश असला तरी मुंबईसह अनेक महापालिकांमधील सत्ताधारी पक्षाचे उमेदवार मतदान होण्याआधीच बिनविरोध म्हणून निवडूण आले आहेत. तसेच या उमेदवारांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर ६० पेक्षा जास्त उमेदवारांची संख्या आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली असतानाच राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बिनविरोध निवडूण आलेल्या उमेदवारांच्या काही गोष्टी तपासणार असल्याची घोषणा केली.

या बिनविरोध निवडीवरून विरोधकांच्या आरोपाची दखल घेत राज्य निवडणूक आयुक्तांनी बिनविरोध निवडूण आलेल्या ठिकाणांचे अहवाल मागविले असून त्या ठिकाणचे चार गोष्टी तपासल्या जाणार असल्याची घोषणा केली आहे.

आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, एक म्हणजे जो उमेदवार बिनविरोध निवडूण आला आहे. त्या उमेदवाराने दुसऱ्या उमेदवारांवर दबाव आणला होता का, दुसरं म्हणजे ज्या उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली त्यांच्यावर काही दबाव होता का किंवा त्यांना काही आमिष दाखवलं होतं का जर असं काही झालं होतं तर त्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती का , याबाबत आणखी कोणाच्या काही तक्रारी आहेत का, ज्या उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली त्याने ती स्वखुशीने माघार घेतली या गोष्टींची तपासणी करणार आहोत, तसेच हे अहवाल पालिका आयुक्तांकडून मागविण्यात आले आहेत. तो अहवाल आल्यानंतर आम्ही बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबाबत पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणूका जाहिर
पुणे विभागः- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोल्हापूर, सोलापूर
कोकण विभागः-रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मराठवाडा विभागः-छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर

Exit mobile version