मागील काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांचे महिलांसोबतच्या अनैतिक संबधाच्या घटनां बाहेर येत आहेत. तसेच त्यासंदर्भात काही व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असताना आता एसंशि अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याने एका विवाहीत महिलेला तिच्या पतीपासून चारच महिन्यात घटस्फोट घ्यायला लावून त्या महिलेशी विवाह केला. मात्र लग्नानंतर सदर महिलेचा शाररीक आणि मानसिक छळ केलाचा आरोप त्या महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी केला.
त्यावर सदर महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे म्हणाले की, सदर महिला ही मुंबईत राहते. सिद्धांत शिरसाट आणि महिलेची फेसबुकवर ओळख झाली. सिद्धांत शिरसाट याने सदर महिलेशी लग्न करण्यासाठी दबाव आणला, त्या महिलेला आत्महत्या करण्याची धमकी दिली, डोक्यात गोळी मारण्याचे आणि हाताला ब्लेडने कापण्याचे काही फोटो पाठविला. त्याचबरोबर सदर महिलेला इमोशनली ब्लॅकमेल केल्याचा आरोपही यावेळी केला.
पुढे बोलताना वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगताना म्हणाले की, शेवटी ती लग्नाला तयार झाली. त्यानंतर लग्नासाठी घटस्फोट घ्यायला लावला. २०१८ पासून त्यांचे संबध होते. तिने सर्व व्हिडिओ आणि कागदपत्रे दाखविली आहेत. आता महिन्याभरापूर्वी त्याने नवीन बंगल्यात दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचे फोटो त्याने तिला पाठविल्याचेही सांगितले.
सिंद्धांत शिरसाट याच्या विरोधात २०२४ मध्ये पोलिस तक्रार करण्यात आली. परंतु त्यावर कारवाई झाली नाही. मंत्री पदाचा आणि आमदारकीचा दबाव आणून काहीही कारवाई केली नाही ३० तारखेला महिला अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करणार असून कायदेशीर नोटीस पाठविण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
या वृत्तानंतर शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी संबधित मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि तिला तिची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी केली.
सकाळी हे वृत्त आल्यानंतर काही वेळानंतर सदर महिलेने काही प्रसार माध्यमांशी बोलताना त्या महिलेने या संदर्भात मी मॅटर क्लोज केला असल्याचे सांगत आता या विषयावर काहीही बोलायचे नाही असे स्पष्ट केले.
