Marathi e-Batmya

बुलढाणातून धनुष्यबाण हद्दपार करा आणि हातात घड्याळ बांधा

बुलढाणा – खामगावः प्रतिनिधी
बुलढाणा जिल्हयातून धनुष्यबाण हद्दपार करा आणि हातात घड्याळ बांधून राजेंद्र शिंगणे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले.
या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री आणि उमेदवार पण डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार प्रकाश गजभिये,कॉंग्रेसचे नेते राणादिलीपकुमार सानंदा आदींसह महाआघाडीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
बुलढाणा जिल्हा विकासात्मकदृष्टया मागे राहिला आहे. विकास करणे, उद्योग आणणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. विदर्भात उद्योग आणा असे मुख्यमंत्र्यांना कितीतरी वेळा सांगितले,परंतु त्यांनी काहीच आणले नाही असा आरोपही त्यांनी केला.
या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मोदी यांची खोटी आश्वासने आणि उध्दव ठाकरे यांनी युती करणार नाही असे जाहीर केलेले वक्तव्य आणि भाजपवर केलेली टिका असेल,किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केलेली टिका असेल,नितीन गडकरी यांनी सत्ता येणार नसल्याचे केलेले भाकीत असेल यांची व्हिडिओ क्लीप यावेळी जनतेला दाखवली. आता लाज बाळगुया म्हणून एकत्र आले आहेत असा आरोपही त्यांनी केले.
खामगावात सध्या परिवर्तनाची हवा आहे. या भागात परिवर्तन करायचे आहे म्हणून लोक सभांना गर्दी करत आहे आणि बदल घडवण्यासाठी कामाला लागले आहेत असे प्रतिपादन माजी मंत्री आणि उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.
स्मृती इराणी यांच्यात आणि आपल्या खासदारामध्ये काही फरक नाही. यांची डिग्री पण फसवी आहे. अशा लोकांना आता बुलढाणाची जनता सभागृहात पाठवणार नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Exit mobile version