Marathi e-Batmya

सीबीआयच्या धाडीवर संजय राऊत म्हणाले दया, कुछ तो गडबड है !

मुंबई: प्रतिनिधी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल करत त्यांच्या निवासस्थानासह इतरांच्याही निवासस्थानी सीबीआयने छापेमारी सुरु केली. त्यामुळे सीबीआयच्या धाडी एफआयआर वगैरे अतिरेक आहे.  हा सर्व प्रकार तर्कसंगत दिसत नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी व्यक्त करत दया, कुछ तो गडबड है अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवरून दिली.

उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करण्याचे सीबीआयला सांगितले होते अशी आठवणही त्यांनी करून दिली.

Exit mobile version