Marathi e-Batmya

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, हनुमानाच्या शेपटीपेक्षा अधिक वाढणाऱ्या महागाईवर बोला

सध्या देशात हनुमानाच्या शेपटीपेक्षा अधिक गतीने महागाई वाढत आहे. मात्र राज ठाकरे तुम्ही फक्त हनुमान चालिसावर बोलत आहात. कधी तरी त्या हनुमान शेपटासारख्या महागाईवरही बोला असा उपरोधिक टोला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लगावला.

आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ही रोज सकाळी हनुमान चालिसा वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत. परंतु ते लोकांमध्ये जावून सांगणे आमच्या संस्कृतीत बसत नाही. कारण धर्म हा वैयक्तिक अस्मितेचा प्रश्न असून धर्मांधतेचा नसल्याचे त्यांनी सांगितले.

देशात हनुमानाच्या शेपटीपेक्षाही अधिक गतीने महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्नही मोठे बनत चालले आहेत. त्याच्यावर काही बोलत नाही याची खंत तुम्हाला वाटत नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

आमचं म्हणणं असे आहे की, सुपारी घेवून बोलण्यापेक्षा परवानगी घेवून कधीही बोलणं चांगल असा उपरोधिक टोला लगावत आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रोज सकाळी हनुमान चालिसा वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत. पण हे लोकांमध्ये जावून सांगणे हे आमच्या संस्कृतीत बसत नाही. कारण धर्म हा वैयक्तिक अस्मितेचा प्रश्न आहे, धर्मांधतेचा नसल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान गुढी पाडव्याच्या दिवशी, त्यानंतर दोन दिवसांनी ठाण्यात झालेल्या उत्तर सफभेत आणि आज पुण्यातील पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सातत्याने मस्जिदीवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेत भोंगे काढा अन्यथा तुमच्या भोंग्यापेक्षा मोठे भोंगे लावून त्यावर हनुमान चालिसा म्हणायला लावू असा इशारा देत तुमच्या अजाण आम्ही ऐकतो तर तुम्हाला आमची हनुमान चालिसा ऐकावी लागेल असा एकप्रकारे दमच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला.

त्याचबरोबर माजी तुमच्या प्रार्थनेला विरोध नाही तर तुमच्या भोंग्यांना आहे. हा सामाजिक विषय असून याकडे सामाजिक विषयच म्हणून बघा असे आवाहन करताना जर आमच्या मिरवणूकांवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आम्हाला काय हात नाहीत का? असा सवाल करत आम्हालाही हात आहेत आम्हीही दगडं उचलू शकतो असे सांगत जे समोर हत्यार असेल ते हाती घ्यायला भाग पाडू नका असा इशारा देत हिंदूंनो तीन तारखेपर्यत तयार रहा असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

Exit mobile version