Marathi e-Batmya

सुनिल तटकरे यांचे आवाहन, … नवीन उभारी घेत आपल्याला काम करायचेय

अजितदादांच्या नेतृत्वाखाली नवा विचार घेऊन राष्ट्रीय पातळीवर खासदार प्रफुलभाई पटेल काम करत आहेत आणि आपण महाराष्ट्रात वेगळी दिशा घेऊन कार्यकर्त्यांच्या सोबतीने राज्यात नवीन उभारी घेत आपल्याला काम करायचे आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज केले.

आज वर्धा येथील विविध पक्षातील पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.

सुनिल तटकरे म्हणाले, विदर्भात पक्षाची ताकद असून त्या ताकदीच्या जोरावर पक्षाची वाटचाल करायची आहे. आज तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असून तुमच्या संघटन कौशल्याचे पक्षवाढीसाठी सहकार्य होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी वर्धा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राणा रननवरे, डॉ.पवन भांदककर, सूरगाव सरपंच गोलूभाऊ शेख, रोशन दुधकोहळे, मनीष वैरागडे, प्रणय फरताडे, सौरभ हारके, मिलिंद भगत आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

पक्ष प्रवेश कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री सुबोध मोहिते,आमदार मनोहर चंद्रीकापुरे, वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version