Marathi e-Batmya

सुप्रिया सुळे यांच्या शरद पवार यांना अनोख्या शुभेच्छा, ‘लढेंगे भी जितेंगें भी’

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे व्यक्तीमत्व असलेल्या शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून शरद पवार यांच्या वाढदिवस दिनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाकडून मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो. तसेच पक्षाच्या विविध उपक्रमाची घोषणाही केली जात असे. मात्र यंदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात फाटाफूट झाल्याने आणि यंदा नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पार पडत आहे. त्यातच केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात कांदा आणि उस उत्पादक शेतकरी, दूधाला मिळणारा दर यासह अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. त्यातच निसर्गाकडून गारपीठ आणि अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्याचेही नुकसान होत आहे. या सगळ्या घडामोडीत राजकारणी आणि लढवय्या असलेल्या नेत्याची मुलगी असलेल्या सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना ८३ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये शुभेच्छा देताना म्हणाल्या की, तुमचा वाढदिवस आमच्यासाठी, तुम्हाला सर्व दिवस सारखेच, लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काल तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे, त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे अशी स्पष्टोक्ती दिली.

पोस्टच्या शेवटी सुप्रिया सुळे यांनी आवर्जून लिहित लढेंगे भी जितेंगी भी असे लिहित संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे असा निर्धार व्यक्त केला.

 

Exit mobile version