राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आतापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर आधारीत रायटींग आणि स्पिचेसचे अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात आली. मात्र कालोऔघात मंत्री बदलला, त्याबरोबर त्यांच्या विभागातील माणसेही बदलली. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव नेमके काय आहे किंवा ते कसे लिहिले जाते याची माहिती नसणारा व्यक्ती विरळाच म्हणावा लागेल.
उद्या 14 एप्रिल असून हा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आहे. या दिवसाचे औचित्य साधत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र व साधने साठी समिती पुर्नगठीत करण्यात आली. मात्र या समितीचा जीआर काढताना डॉ बाबासाहेब आंबेडरकर असे चुकीचे शासन निर्णयात छापले आहे.
त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशीच बाबासाहेबांचा अपमान शासनाकडून जाणीवपूर्वक केला का असा सवाल मंत्रालयात उपस्थित करण्यात आला. त्यामुळे अखेर ही नावात झालेली चुक लक्षात येताच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सुधारीत शासन निर्णय जारी करण्यात आला.
आडनाव चुकलेला हाच तो जीआर
आणि हा सुधारीत शासन निर्णय खालीलप्रमाणे
