Marathi e-Batmya

मुख्यमंत्री पुत्राच्या त्या फोटोला प्रत्युत्तर देण्याच्या नादात शीतल म्हात्रे आल्या अडचणीत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून काम करत असल्याचा फोटा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकिय कृत्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे गटाच्या समर्थक शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला मॉर्फिंग केलेला फोटो ट्विट केला. या फोटोतील फोलपणा उघडकीस आणत म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रविकांत वर्पे यांनी खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून काम करत असल्याचा फोटो ट्विट करत महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली. तसेच शिंदे यांच्यावर टीकेची झोडही उठविली.

त्यावर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी खुलासा देत राज्याच्या अनवधानाने चुक झाल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

त्यानंतर आज शनिवारी सकाळी शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला मार्फ केलेला फोटो ट्विट केला. तसेच हा फोटो पाहिलात असा सवालही केला. हे ट्विट पहात राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे यांचा मुळ फोटो आणि मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या केबिनचा मुळ फोटो जाहिर कर म्हात्रे यांचा फोटोतील फोलपणा उघडकीस आणला.

त्यानंतर शीतल म्हात्रे यांनी मी तो फोटो ट्विट केला पण त्या फोटोत मी कुठेही तो फोटो खरा आहे असा दावा केलेला नाही. तो फोटो फक्त समाज माध्यमात व्हायरल झाल्याने तो ट्विट केल्याचा दावा केला.

Exit mobile version