Marathi e-Batmya

उदयनराजे भोसलेंचा ८३ हजाराने लोकसभा पोटनिवडणूकीत पराभव

मुंबईः प्रतिनिधी
सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करत पोटनिवडणूक लढविली. मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशाने नाराज झालेल्या सातारकरांनी उदयनराजेंना पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले.
या पोटनिवडणूकीत श्रीनिवास पाटील यांना ४ लाख ८२ हजार ९४७ मते मिळाली. तर भाजपाचे उदयनराजे भोसले यांना ४ लाख ७४४ मते मिळाली. उदयनराजेंना मिळालेल्या मतांपेक्षा जास्तीची ८२ हजार ९४७ मते श्रीनिवास पाटील यांना मिळाल्याने ते विजयी ठरले.

Exit mobile version