Breaking News

वैभव नाईक यांचा आरोप, पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरला जिल्हा नियोजन फंडातून पैसे कागदपत्रातूनच माहिती तशी दिली

साधारणतः ८ ते ९ महिन्यापूर्वी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथे बसविण्यात आला. त्या पुतळ्याच्या आजूबाजूला जे सुशोभिकरण करण्यात आले, त्यासाठी जिल्हा नियोजनच्या फंडातून पैसे देण्यात आल्याची नोंद कागदपत्रांमध्ये आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरसाठी जे पेट्रोल-डिझेल भरण्यात आले. त्यासाठीही जिल्हा नियोजन समितीतून पैसे देण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असल्याची गौप्यस्फोट शिवसेना उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आज केला.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक यांनी यावेळी हा गौप्यस्फोट केला.

पुढे बोलताना वैभव नाईक म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरसाठी जर जिल्हा नियोजन फंडातून पैसे दिल्याचा लेखी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. यावरून पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरसाठी लागणारे पेट्रोल-डिझेल भरायला केंद्र सरकारकडे पैसे नाहीत का असा सवालही केला.

वैभव नाईक पुढे बोलताना म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जी काही कारणे सांगून पैसे काढण्यात आले. त्या सर्व पैशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला असून हा पैसा नारायण राणे यांच्या निवडणूक खर्चासाठी वापरण्यात आल्याचा आरोप करत या पुतळ्यावरील खर्चाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणीही यावेळी केली.

वैभव नाईक यांनी सांगितले की, पुतळा अनावरणासाठी जिल्हा नियोजन फंडातून ५ कोटी ५४ लाख रूपयांचा खर्च करण्यात आला. त्या रकमेत हेलिकॉप्टर इंधन, डिव्ही कार, शासकिय वाहनांसाठीचे इंधन यासह अनेक गोष्टींवर खर्च करण्यात आल्याचे सांगत यासगळ्या प्रकरणातील नेमकी माहिती बाहेर आली पाहिजे.

शेवटी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, पुतळ्यासाठी जर नेव्हीने खर्च केल्याचे सांगण्यात येत आहे, तर मग जिल्हा नियोजन फंडातून वेगवेगळ्या कारणासाठी पैसे का काढण्यात आले असा सवालही यावेळी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत