Marathi e-Batmya

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर पुरेसे पिण्याचे पाणी, ओआरएस पॅकेट तसेच मतदारांच्या संख्येनुसार पुरेशा प्रमाणात मंडप व्यवस्था, प्रतिक्षा कक्षाची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत एस चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना एस चोक्कलिंगम म्हणाले, दुस-या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ८ लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. दुसऱ्या टप्पात एकूण सरासरी ६२.७१ टक्के मतदान झाले.

तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील ०२, पुणे विभागातील ०७ व औेरंगाबाद विभागातील ०२ अशा एकूण ११ लोकसभा मतदारसंघामध्ये ७ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण २३ हजार ०३६ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी ०९ लाख ९२ हजार ६१६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या अकरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ४६,४९१ तर कंट्रोल युनिट (सीयु) २३,०३६ आणि २३,०३६ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून तिसऱ्या टप्प्यात एकूण २५८ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तिसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मात्र मतदान केंद्रावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत जेवढे मतदार उपस्थित असतील त्या सर्वांची मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे मतदान केंद्र सुरु राहील. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली असून घरोघरी वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या असून इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज असून सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करत आपला मतदानाचा महत्वपूर्ण हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन एस चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी सुविधा

८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मतदानाच्या ४८ तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या ४८ तास आधी अकराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये ४८ तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत

प्रतिबंधात्मक कारवाई

कायदा व सुव्यवस्थांतर्गत १ मे पर्यंत ५०,३९७ शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून १,११० शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे १,५९५ इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत १,११,८७८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. राज्यामध्ये १ मार्च ते २ मे २०२४ या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ४९.९५ कोटी रोख रक्कम तर ३६.८० कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू १२९.८९ कोटी रुपये, ड्रग्ज २२०.६५ कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत ९२.९२ कोटी रुपये अशा एकूण ५३०.६९ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

३३,४६१ तक्रारी निकाली

१६ मार्च ते २ मे २०२४ या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ४३४२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ४३३३ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ३४,१६८ तक्रारीपैकी ३३,४६१ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे २०५ प्रमाणपत्र वितरित

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने २०५ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील ८ लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या मतदानाच्या टक्केवारी

 

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरूष मतदार

मतदान केलेले पुरूष मतदार

महिला मतदार

मतदान केलेल्या महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

मतदान केलेले तृतीयपंथी मतदार

एकूण मतदार टक्केवारी

1

05- बुलढाणा

933173

603525

(64.67%)

849503

502226

(59.12%)

24

10

(41.67%)

62.03%

2

06 – अकोला

977500

 

634116

(64.87%)

913269

 

534239

(58.50%)

45

11

 (24.44%)

61.79%

 

3

07- अमरावती

944213

 

631920

(66.93%)

891780

537183

(60.24%)

85

18

(21.18%)

63.67%

 

4

08- वर्धा

858439

 

586780

(68.35%)

824318

 

504560

(61.21%)

14

 

9

(64.29%)

64.85%

 

5

14- यवतमाळ – वाशिम

1002400

 

655658

(65.41%)

938452

 

564508

(60.15%)

64

 

23

(35.94%)

62.87%

 

6

15 – हिंगोली

946674

 

628302

(66.37%)

871035

 

526647

(60.46%)

25

 

9

(36.00%)

63.54%

 

7

16 -नांदेड

955084

 

606482

(63.50%)

896617

 

522062

(58.23%)

142

 

20

(14.08%)

60.94%

 

8

17 -परभणी

1103891

 

717617

(65.01%)

1019132

 

604247

(59.29%)

33

 

4

(12.12%)

62.26%

 

 

तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील ०२ आणि पुणे विभागातील ०७ व औेरंगाबाद विभागातील ०२ अशा एकूण ११ लोकसभा मतदारसंघामध्ये ७-५-२०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.   त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

मतदान केंद्रे

क्रिटिकल मतदान केंद्र

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या

बॅलेट युनिट (बीयु)

कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट

1

32-रायगड

2185

06

13

2185

2185

2185

2

35-बारामती

2516

03

38

7548

2516

2516

3

40-धाराशीव

(उस्मानाबाद)

2139

08

31

4278

2139

2139

4

41-लातूर

2125

16

28

4250

2125

2125

5

42-सोलापुर

1968

14

21

3936

1968

1968

6

43-माढा

2030

16

32

6090

2030

2030

7

44-सांगली

1830

06

20

3660

1830

1830

8

45-सातारा

2315

40

16

4630

2315

2315

9

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

1942

00

09

1942

1942

1942

10

47-कोल्हापुर

2156

03

23

4312

2156

2156

11

48-हातकणंगले

1830

02

27

3660

1830

1830

एकूण

23036

114

258

46491

23036

23,036

मतदारांची संख्या 

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकुण

85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12अर्जांची संख्या.

1

32-रायगड

8,20,605

8,47,763

4

16,68,372

3,146

2

35-बारामती

12,41,945

11,30,607

116

23,72,668

431

3

40-धाराशीव (उस्मानाबाद)

10,52,096

9,40,560

81

19,92,737

4,588

4

41-लातूर

10,35,376

9,41,605

61

19,77,042

2,566

5

42-सोलापुर

10,41,470

9,88,450

199

20,30,119

2,052

6

43-माढा

10,35,678

9,55,706

70

19,91,454

2,346

7

44-सांगली

9,53,024

9,15,026

124

18,68,174

1,859

8

45-सातारा

9,59,017

9,30,647

76

18,89,740

1,272

9

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

7,14,945

7,36,673

12

14,51,630

 

3,726

10

47-कोल्हापुर

9,84,734

9,51,578

91

19,36,403

3,103

11

48-हातकणंगले

9,25,851

8,88,331

95

18,14,277

1,122

एकूण

  1,07,64,741

  1,02,26,946

929

2,09,92,616

26,211

 

चौथ्या टप्पा :-

            चौथ्या टप्प्यात ०१ नंदुरबार, ०३ जळगाव, ०४ रावेर, १८ जालना, १९ औरंगाबाद, ३३ मावळ, ३४ पुणे, ३६ शिरूर, ३७ अहमदनगर, ३८ शिर्डी, ३९ बीड अशा एकूण ११ लोकसभा मतदारसंघामध्ये १३-५-२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा २९-०४-२०२४ असा होता. त्यानुसार अंतिम उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

अंतिम उमेदवारांची  संख्या

1

01 नंदुरबार

11

2

03 जळगाव

14

3

04 रावेर

24

4

18 जालना

26

5

19 औरंगाबाद

37

6

33 मावळ

33

7

34 पुणे

35

8

36 शिरूर

32

9

37 अहमदनगर

25

10

38 शिर्डी

20

11

39 बीड

41

 

एकूण

298

 

चौथ्या टप्यातील ११ लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येचा अंतिम तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकुण

मतदान केंद्रे

1

01 नंदुरबार

9,92,971

9,77,329

27

19,70,327

2,115

2

03 जळगाव

10,37,350

9,56,611

85

19,94,046

1,982

3

04 रावेर

9,41,732

8,79,964

54

18,21,750

1,904

4

18 जालना

10,34,106

9,33,416

52

19,67,574

2,061

5

19 औरंगाबाद

10,77,809

9,81,773

128

20,59,710

2,040

6

33 मावळ

13,49,184

12,35,661

173

25,85,018

2,566

7

34 पुणे

10,57,870

10,03,082

324

20,61,276

2,018

8

36 शिरूर

13,36,820

12,02,679

203

25,39,702

2,509

9

37 अहमदनगर

10,32,946

9,48,801

119

19,81,866

2,026

10

38 शिर्डी

8,64,573

8,12,684

78

16,77,335

1,708

11

39 बीड

11,34,284

10,08,234

29

21,42,547

2,355

एकूण

1,18,59,645

1,09,40,234

1,272

2,28,01,151

23,284

 

 मतदारांचा तुलनात्मक तपशील :- चौथ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदार संघातील सन २०१४ व सन २०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

2014 मधील मतदार संख्या

2019 मधील मतदार संख्या

2024 मधील मतदार संख्या

1

01 नंदुरबार

16,72,943

18,71,099

19,70,327

2

03 जळगाव

17,07,969

19,31,400

19,94,046

3

04 रावेर

15,93,389

17,75,051

18,21,750

4

18 जालना

16,12,056

18,67,220

19,67,574

5

19 औरंगाबाद

15,89,395

18,86,284

20,59,710

6

33 मावळ

19,53,741

22,98,080

25,85,018

7

34 पुणे

18,35,835

20,75,824

20,61,276

8

36 शिरूर

18,24,112

21,75,529

25,39,702

9

37 अहमदनगर

17,05,005

18,61,396

19,81,866

10

38 शिर्डी

14,62,267

15,87,079

16,77,335

11

39 बीड

17,92,652

20,45,405

21,42,547

 

   वयोगटानुसार मतदार संख्या :-

अ.क्र

मतदार संघाचे नाव

18-19

20-29

30-39

40-49

50-59

60-69

70-79

80 +

1

01 नंदुरबार

33,195

4,44,318

4,42,554

4,12,872

2,99,440

1,97,118

98,708

42,122

2

03 जळगाव

28,173

3,85,412

4,48,921

4,53,736

3,13,022

2,03,452

1,09,828

51,502

3

04 रावेर

29,169

3,64,731

4,11,626

3,87,164

2,87,284

1,91,712

1,01,825

48,239

4

18 जालना

29,790

4,17,782

4,80,225

4,12,352

2,86,020

1,80,300

1,00,860

60,245

5

19 औरंगाबाद

34,075

4,19,432

5,11,470

4,39,843

3,20,650

1,81,684

98,509

54,047

6

33 मावळ

35,331

4,53,849

6,68,235

5,84,842

4,01,439

2,54,503

1,28,919

57,900

7

34 पुणे

21,951

2,80,253

4,63,845

4,74,038

3,54,180

2,40,169

1,49,663

77,177

8

36 शिरूर

32,081

4,52,025

6,67,012

5,74,166

3,75,316

2,36,420

1,34,244

68,438

9

37 अहमदनगर

27,536

3,67,609

4,24,428

4,19,620

3,16,909

2,20,450

1,33,393

71,921

10

38 शिर्डी

25,303

 3,36,888

3,69,136

3,53,420

2,70,905

1,76,561

96,858

48,264

11

39 बीड

25,011

4,30,572

5,06,935

4,52,586

3,15,725

2,09,883

1,28,144

73,691

          एकूण

3,21,615

43,52,871

53,94,387

49,64,639

35,40,890

22,92,252

12,80,951

6,53,546

 

 

 

   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 पाचवा टप्पा:-     

लोकसभा निवडणूकीचा पाचव्या टप्प्याबाबतची माहिती :- पाचव्या टप्प्यात नाशिक  विभागातील ०३ आणि कोकण विभागातील १० अशा एकूण १३ लोकसभा मतदारसंघामध्ये २०-०५-२०२४  रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. 

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

दिनांक 26.04.2024

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक

दिनांक 03.05.2024

नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांक

दिनांक 04.05.2024

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक

दिनांक 06.05.2024

मतदानाचा दिवस

दिनांक 20.05.2024

 

2.  पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात ०२-०५-२०२४ पर्यंत खालीलप्रमाणे उमेदवार व त्यांची नामनिर्देशने प्राप्त झालेली आहेत.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

उमेदवारांची  संख्या

नामनिर्देशनाची संख्या

1

02 धुळे

10

13

2

20 दिंडोरी

09

16

3

21 नाशिक

18

27

4

22 पालघर

11

13

5

23भिंवडी

15

16

6

24 कल्याण

15

23

7

25 ठाणे

14

17

8

26 मुंबई उत्तर

11

18

9

27 मुंबई उत्तर – पश्चिम

15

16

10

28 मुंबई उत्तर – पूर्व

20

24

11

29 मुंबई उत्तर – मध्य

13

14

12

30 मुंबई दक्षिण – मध्य

14

19

13

31 मुंबई दक्षिण

08

13

 

एकूण

173

229

 

 

 

Exit mobile version