Breaking News

दुपारी १ वाजेपर्यंत ३० तर ३ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात संथगतीने मतदान

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ पासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.१९ टक्के तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४६. १३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले. वर्धा ३०.२२ %, रामटेक (अ.जा.) २३.१९%, नागपूर २७.४७%, भंडारा-गोंदिया ३२.०२%, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) ४१.८७%, चंद्रपूर ३०.५०% आणि यवतमाळ-वाशिम २६.०९% मतदान झाले.
दुपारी ३ वाजेपर्यंत झालेले मतदान
पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे. वर्धा ४३.९०%, रामटेक (अ.जा.) ४४.५०%, नागपूर ४१.२५%, भंडारा-गोंदिया ४९.०५%, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) ५७%, चंद्रपूर ४६.३०% आणि यवतमाळ-वाशिम ४३.३५% टक्के मतदान झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत