मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून शोध घेण्यात येत असलेल्या मारेकरी आणि मास्टरमाईंडचा शोध घेण्यात येत होता. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे नाव पुढे आले. अखेर प्रकरणी राजकिय गरमागरमी झाल्यानंतर अखेर या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड यांने सीआयडीसमोर शरणगती पत्करली. मात्र ही शरणागती पत्करण्याआधी काही तास आधी वाल्मिक कराड याने एक व्हिडीओ जारी केला होता. वाल्मिक कराड नेमकं काय म्हणाल्या त्या व्हिडिओमध्ये…
वाल्मिक कराडने जारी केलेल्या व्हिडिओत म्हणाला की, “मी वाल्मिक कराड माझ्या विरोधात केज पोलिस स्टेशनमध्ये खंडणीची खोटी फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असतानाही मी सीआयडी ऑफिस पाषाण रोड येथे सरेन्डर होत आहे. संतोष भैय्या देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.”
“राजकिय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. पोलिस तपासाचे निष्कर्षात मी दोषी दिसलो किंवा तसे सिद्ध झाले तर त्यानिमित्ताने न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगावयास मी तयार आहे.”
या आशयाचे वक्तव्य करणारा ३० सेकंदाचा व्हिडिओ वाल्मिक कराड यांच्याकडून जारी करण्यात आला होता. त्या व्हिडिओत वाल्मिक कराड हा त्याच्यावर जर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपास निष्कर्षात जर सहभाग असल्याचे स्पष्ट झाले तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगण्यास तयार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
त्यामुळे वास्तविक पाहता वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर यासंदर्भात गुन्हे दाखल आहेत. मात्र त्यात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे आतापर्यंत वाल्मिक कराडचे नाव या गुन्हे प्रकरणात दाखल नसल्याचे स्पष्ट असताना या आता नव्याने वाल्मिक कराड याचे नाव कशा पद्धतीने जोडले जाणार याबाबत संशय निर्माण होत आहे.
दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं? खरातर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. १७ तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते.
पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत… pic.twitter.com/NsXDp0djky
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 31, 2024
