नीट NEET आणि सीबीएसई CBSE घोटाळ्यावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी या आठवड्याच्या अखेरीस राष्ट्रीय राजधानीत आंदोलनाची तयारी करत असताना, कॉकरोच जनता पक्षाने (CJP) बुधवारी (३ जून, २०२६) आपल्या मागण्यांवर सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांशीही संवाद साधण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पक्षाच्या पहिल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना, CJP चे प्रवक्ते आणि स्वतंत्र पत्रकार सौरभ दास यांनी, सरकारने मंगळवारी CBSE अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांच्या केलेल्या बदल्यांना ‘केवळ देखावा’ असे संबोधून फेटाळून लावले. सीजेपीने प्रवक्ते सौरभ दास यांच्या बरोबरच अभिषेक रांका, चित्रपटाशी संबधित विजय दहिया यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे.
पक्षाने देशभरातील तरुणांना प्रस्तावित आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सौरभ दास पुढे म्हणाले की,”आम्ही एक खुले आवाहन केले आहे. कोणीही पक्षाच्या बॅनरशिवाय आमच्यात सामील होऊ शकतो. आम्ही सत्ताधारी असोत वा विरोधी पक्ष, सर्वांशी संवाद साधायला तयार आहोत,” असे सांगतानाच सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी ६ जून रोजी केलेल्या आंदोलनाच्या आवाहनाचा संदर्भ देत म्हटले.
पुढे बोलताना सौरव दास म्हणाले की, “आम्ही व्यवस्थेमध्ये उत्तरदायित्वाची मागणी करत आहोत. आम्ही शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आलो आहोत, परंतु आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. बदल्यांना कारवाई म्हणून दाखवले जात आहे. पण तसे नाही. व्यवस्थेत सडका आला आहे,” असे सांगितले.
२२ मे रोजी, दिल्ली उच्च न्यायालयाने दास आणि ‘आप’चे नेते गोपाल राय यांना नोटीस बजावली. दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणाच्या सुनावणीतून नुकतेच माघार घेतलेल्या न्यायमूर्ती स्वरणा कांता शर्मा यांच्या विरोधात कथित “नियोजित सोशल मीडिया मोहिमे”प्रकरणी त्यांच्यावर अवमान कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर ही नोटीस आहे.
दास यांनी सांगितले की, अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असलेले अभिजीत दीपके, ६ जून रोजी सकाळी ८ वाजता दिल्लीत उतरल्यावर, जंतर मंतर येथील प्रस्तावित निदर्शनासाठी परवानगी मागण्याकरिता दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला भेट देतील.
पूर्वी ‘आप’च्या सोशल मीडिया टीमचे प्रमुख सदस्य राहिलेल्या अभिजीत दीपके यांनी जाहीर केले आहे की, हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक हेदेखील या आंदोलनात त्यांच्यासोबत सामील होतील.
अभिजित दीपके परतल्यावर त्यांच्यावर पोलीस कारवाई होण्याची शक्यता वर्तवताना, पक्षाने राजकीय संशोधक, लेखक आणि चित्रपट निर्माते म्हणून ओळख दिलेल्या सीजेपीचे आणखी एक प्रवक्ते विजेता दहिया म्हणाले, “जर सोनम वांगचुक यांना अटक होऊ शकते, तर दीपके यांनाही अटक होऊ शकते. जर त्यांना अटक झाली, तर अधिक लोक आमच्या पाठीशी उभे राहतील.” ‘आप’सोबतच्या सीजेपीच्या कथित संबंधांबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना, सीजेपीचे पदाधिकारी आशुतोष रांका म्हणाले, “आमचे पूर्वीचे संबंध महत्त्वाचे नाहीत. ही लढाई त्यापेक्षा मोठी आहे. सीजेपी ही कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेपेक्षा मोठी आहे.” आयआयटी कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी असलेले आशुतोष रांका यांनी यापूर्वी लंडनमधील जागतिक सल्लागार कंपनी मॅकिन्से अँड कंपनीमध्ये काम केले आहे. त्यांची सीजेपीचे प्रवक्ते म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
दहिया म्हणाले की, हे आंदोलन राजकीय व्यवस्थेबद्दल तरुणांमध्ये वाढणाऱ्या असंतोषाचे प्रतिबिंब आहे.
“ज्या प्रकारे या आंदोलनाने लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे, त्यावरून हे दिसून येते की एक संपूर्ण पिढी सध्याच्या परिस्थितीवर असंतुष्ट आहे,” असे ते म्हणाले.
प्रस्तावित आंदोलनाच्या स्थळाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आशुतोष रांका म्हणाले की, आयोजकांना अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळण्याची आशा आहे.
“जंतर मंतर हे ऐतिहासिकदृष्ट्या शांततापूर्ण विरोधाचे ठिकाण राहिले आहे. आम्हाला विश्वास आहे की पोलीस आम्हाला परवानगी देतील,” असे ते म्हणाले.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांपैकी एक पूर्ण करत धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यास काय होईल, असे विचारले असता आशुतोष रांका म्हणाले, “ही परिस्थिती वेगाने बदलत आहे. जर प्रधान यांनी पुढील दोन दिवसांत राजीनामा दिला, तर आम्ही तुम्हाला आमच्या भूमिकेबद्दल माहिती देऊ.”
