Marathi e-Batmya

मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, भाजपाकडून संविधानावरील हल्ला अव्यातपणे सुरु

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकशाही संस्थांना कमजोर करत असल्याचा आरोप केला. तसेच “संविधानावरील हल्ला अव्याहतपणे सुरू आहे” आणि तपास यंत्रणांचा “राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी सातत्याने वापर केला जात,” असल्याचा आरोपही केला.

इंडिया ब्लॉकच्या बैठकीत मतदार याद्यांची विशेष सखोल उजळणी (SIR), परीक्षेचे पेपरफुटी, कथित घराणेशाही भांडवलशाही, बिगर-एनडीए राज्य सरकारांवरील हल्ले, वंचित समुदायांवरील अत्याचार आणि केंद्राच्या परराष्ट्र धोरणातील त्रुटी यांसारख्या विविध विषयांवर चर्चा झाली.

दिल्लीत इंडिया ब्लॉकच्या बैठकीला संबोधित करताना मल्लिकार्जून खर्गे पुढे म्हणाले की, बिगर-भाजप सरकारांना केंद्राकडून भेदभावाला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे देशभरातील जनता जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींचा भार सहन करत आहे. त्यांनी विरोधी पक्षांना नागरिकांवर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर एकजूटीने  राहण्याचे आवाहन केले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे बेरोजगारी आणि नोकरभरतीवरही चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की, परीक्षा पद्धतीच्या “घोर गैरव्यवस्थापनामुळे” लाखो तरुणांच्या आशा-आकांक्षांचा विश्वासघात होत आहे. वाढत्या प्रशासकीय अपयशांना विरोधकांकडून समन्वित प्रतिसादाची गरज असल्याचे सांगितले.

नवी दिल्लीत इंडिया ब्लॉकच्या बैठकीचे उद्घाटन करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मोदी सरकारच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरील गैरकारभाराचा सामना करण्यासाठी विरोधी आघाडीने आपली एकता अधिक मजबूत केली पाहिजे असे मतही यावेळी व्यक्त केले.

मल्लिकार्जून खर्गे यांनी १७ एप्रिल, २०२६ रोजी लोकसभेत विरोधी पक्षांनी केलेल्या संयुक्त कृतीची आठवण करून दिली आणि केंद्राच्या ‘दुर्भावनापूर्ण’ मतदारसंघ पुनर्रचना प्रस्तावांना पराभूत करून आघाडीने आपली ताकद दाखवून दिली असल्याचे म्हटले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आरोप केला की, विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेमुळे लाखो लोक त्यांच्या मतदानाच्या हक्कांपासून वंचित राहत आहेत. तसेच, त्यांनी सरकारवर संविधानावर सतत हल्ले करणे, राजकीय विरोधकांविरुद्ध तपास यंत्रणांचा गैरवापर करणे आणि बिगर-भाजप राज्य सरकारांशी भेदभाव करणे असे आरोप केले.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, वाढत्या किमती, गुंतवणुकीतील घट, वाढती खाजगी मक्तेदारी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) भेडसावणाऱ्या अडचणी, प्रश्नपत्रिका फुटणे आणि वंचित समुदायांवरील कथित अत्याचार याकडेही लक्ष वेधले. तसेच खर्गे यांनी पुढे केंद्राच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आणि दावा केला की या धोरणामुळे भारताची दीर्घकाळ चालत आलेली मूल्ये आणि भूमिका धोक्यात आली आहे.

नवी दिल्लीतील इंडिया आघाडी ब्लॉकच्या बैठकीला २३ विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींसह अपक्ष राज्यसभा खासदार कपिल सिबल उपस्थित आहेत. बैठकीत प्रतिनिधित्व करणारे पक्ष आहेत:

काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (RJD), नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP), झारखंड मुक्ती मोर्चा (JMM), शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), सीपीआय(एम), सीपीआय, सीपीआय (एमएल) लिबरेशन, क्रांतिकारी समाजवादी पक्ष (RSP), इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML), विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK), मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK), केरळ काँग्रेस, केरळ काँग्रेस (एम), राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (RLP), भारत आदिवासी पक्ष (BAP), लोकदल, फॉरवर्ड ब्लॉक, शेतकरी कामगार पक्ष (SKP) आदी पक्षानी या बैठकीला हजेरी लावली.

या बैठकीत विरोधी पक्षातील समन्वय आणि भविष्यातील निवडणुकीपूर्वी प्रमुख राजकीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

आरएलडीचे राष्ट्रीय सचिव अनुपम मिश्रा यांनी दावा केला आहे की, उत्तर प्रदेशातील काँग्रेस-समाजवादी पक्षाची युती टिकण्याची शक्यता नाही आणि ती केवळ ‘कागदावर’ आहे. इंडिया ब्लॉकच्या बैठकीपूर्वी बोलताना अनुपम मिश्रा म्हणाले की, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वैयक्तिक मतभेद आहेत आणि ते अनेक मुद्द्यांवर एकमेकांवर नाराज आहेत.

“जर दोन्ही पक्षांमध्ये सर्व काही ठीक असते, तर दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत असूनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीमुद्दीन सिद्दिकी समाजवादी पक्षात गेले नसते,” असे सांगितले.

सीपीआय(एम)चे सरचिटणीस एम. ए. बेबी म्हणाले की, त्यांच्या पक्षाने इंडिया ब्लॉकच्या कार्यपद्धतीबद्दलची आपली चिंता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे व्यक्त केली आहे आणि सर्व आघाडीतील भागीदारांनी अधिक केंद्रित आणि जबाबदारपणे काम केले पाहिजे यावर जोर दिला.

तिरुवनंतपुरममध्ये बोलताना बेबी म्हणाले की, दिल्लीतील इंडिया ब्लॉकच्या बैठकीत सीपीआय(एम)चे खासदार जॉन ब्रिटास यांनी पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते.

केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सीपीआय(एम)च्या नेतृत्वाखालील एलडीएफचे भाजपासोबत संगनमत असल्याच्या काँग्रेस नेत्यांच्या आरोपांवरून त्यांनी टीका केली आणि हा आरोप ‘पूर्वग्रहदूषित’ असल्याचे म्हटले.

Exit mobile version