Marathi e-Batmya

म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांचा मुंबई दौरा, पण अदानीला काम देण्यासाठी की, विमानतळ पाहणीचा

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा डॉलर घसरला आहे. तसेच अमेरिकेच्या धमक्यांसमोर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नांगी टाकली अशी चर्चा भारतात आणि बाहेर विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच इराण आणि रशियाकडून तेल खरेदी बंद झाल्याने देशांतर्गत महागाई मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. परंतु पंतप्रधान मोदी हे त्यांचे मित्र अदानी यांच्यासाठीच परदेश दौरे आणि त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने करार मदार करत असल्याचे आरोप काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर जीव्हीकेने बांधकाम केलेल्या मुंबईतील अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम केले. तसेच देशातील इतर ठिकाणच्या विमानतळाचे कामही जीव्हीके कंपनीने केलेले आहे. मात्र आता देशातील अनेक मोठी विमानतळ ऑपरेटींगचे काम केंद्र सरकारने गौतम अदानी यांच्या कंपनीला दिले. मात्र दरम्यानच्या काळात दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग हे ही आता अदानीला काम देण्यासाठी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहणी करण्यासाठी मुंबईच्या खास दौऱ्यावर आल्याची माहिती पुढे आली आहे.

तसेच अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग  यांनी आज पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवाशी सोयी सुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद ‘इमिग्रेशन’ सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार म्यानमार मध्येही एक नवे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ बांधण्यात येत आहे. त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ग्लोबल टेंडरिंगही जारी करण्यात आले आहे. त्या टेंडरिंगमध्ये गौतम अदानी यांच्या कंपनीनेही टेंडर भरल्याची चर्चा आहे. त्यामुळे म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष सध्या विविध देशात जाऊन तेथील विमानतळांची पाहणी करत आहेत. त्याच धोरणानुसार राष्ट्राध्यक्ष ह्लाईंग हे मुंबई दौऱ्यावर आले होते आणि अदानीकडून ऑपरेट करण्यात येत असलेल्या विमानतळाची माहिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी ते मुंबई दौऱ्यावर आले होते अशी माहिती पुढे आली आहे.

राष्ट्राध्यक्ष ह्लाईंग हे अंधेरी येथील विमानतळावर पोहोचल्यानंतर अदानी कंपनीचे अनेक अधिकारी त्यांना प्रत्यक्ष गोष्टींची माहिती देण्यासाठी राष्ट्राध्यक्षांच्यासोबतच विमानतळावर फिरत राहिले. काही वेळानंतर राष्ट्राध्यक्ष ह्लाईंग यांना घेऊन अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विमातळाच्या खालच्या मजल्यावर घेऊन गेले. मात्र तेथे गेल्यानंतर पुढील बैठकीत किंवा चर्चेत महाराष्ट्र सरकारची असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना मात्र लांब ठेवण्यात आल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न छ्पाण्याच्या अटीवर दिली.

राष्ट्राध्यक्ष ह्लाईंग यांच्यासोबत म्यानमार राष्ट्रपती कार्यालयाचे केंद्रीय मंत्री खिन माउंग यी, वित्त आणि महसूल मंत्री डॉ. कान झॉ, कृषी मंत्री मिन नाउंग, उद्योग आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास मंत्री डॉ. चार्टी थान, परराष्ट्र व्यवहार मंत्री टिन माउंग स्वे, म्यानमारच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर डॉ. खिन नाइंग ऊ, संरक्षण दलातील लेफ्टनंट जनरल मो म्यिंट स्वे, राष्ट्रीय नियोजन, गुंतवणूक आणि परकीय आर्थिक संबंध मंत्री यू थंत सिन ल्विन, स्थलांतर आणि लोकसंख्या मंत्री डॉ. खाइंग खाइंग सो, वाणिज्य मंत्री मिन मिन आदी यावेळी उपस्थित होते. राजशिष्टाचार अधिकारी दिलीप शेडमेखे, अदानी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विष्णू झा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक दीपक अग्रवाल हे अधिकारी देखील उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ह्लाईंग यांचा दौऱा त्यांच्या देशाच्या व्यावसायिक कारणासाठी होता की, पंतप्रधानांचे जवळचे मित्र अदानी यांच्या कंपनीला काम देण्यासाठी हा दौरा होता. आणि त्या गोष्टीचे मध्यस्थ म्हणून महाराष्ट्र सरकार काम तर करत नाही ना असा सवाल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.

म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांची गेट वे ऑफ इंडियाला भेट रचना व ऐतिहासिक महत्त्वाने प्रभावीत

 

 भारत दौऱ्यावर आलेल्या म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचे शिष्टमंडळ, तसेच ताज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते.

राष्ट्राध्यक्ष यु मिन आंग ह्लाईंग यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तूरचनाऐतिहासिक महत्त्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. भेटी दरम्यान राष्ट्रपतींनी या भव्य स्मारकाची बारकाईने पाहणी केली. गेट वे ऑफ इंडियाची वैशिष्ट्येबांधकामातील कलात्मकता; तसेच भारताच्या इतिहासातील स्थान याविषयी त्यांनी विशेष उत्सुकता दाखवली.

गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि वास्तुशिल्पीय वैशिष्ट्ये जाणून घेताना ह्लाईंग यांनी गेटवे ऑफ इंडियाचे कौतुक केले. त्यांनी यावेळी विविध पैलूंची माहिती उत्सुकतेने समजून घेतली व व्यक्त केला.

००००

Exit mobile version