Marathi e-Batmya

मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, राजकारण करू नका, पण भारताचे यश वाखाणण्या जोगे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२९ मार्च, २०२६) नमूद केले की, पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे “आव्हानात्मक काळ” निर्माण झाला आहे आणि या मुद्द्याचे “राजकारण” करणाऱ्यांना असे करण्यापासून परावृत्त होण्याचे आवाहन केले. त्यांनी भारतीयांना या संकटाशी संबंधित अफवांवर विश्वास ठेवण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही केले.

आपल्या मासिक ‘मन की बात’ संबोधनादरम्यान बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोविड-१९ महामारीनंतर, जग पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करेल अशी अपेक्षा होती.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “तथापि, जगाच्या विविध भागांमध्ये युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती सतत निर्माण होत आहे”. “सध्या, आपल्या शेजारी एक महिन्यापासून भीषण युद्ध सुरू आहे. आपले लाखो कुटुंबीय, जवळचे आणि प्रियजन या देशांमध्ये राहतात, विशेषतः आखाती देशांमध्ये काम करतात. मी आखाती देशांचा मनापासून आभारी आहे, जे तेथील १ कोटींहून अधिक भारतीयांना सर्व प्रकारची मदत पुरवत आहेत,” असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम आशियाई प्रदेश हा आपल्या ऊर्जेच्या गरजांचे एक प्रमुख केंद्र आहे, ज्यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलबाबत एक “संकट” निर्माण होत आहे.

पंतप्रधान मोदी बोलताना म्हणाले की, “हे निश्चितच आव्हानात्मक काळ आहेत,” . “मी माझ्या सर्व देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन करतो की, आपण सर्वांनी एकजुटीने या आव्हानावर मात केली पाहिजे. जे या मुद्द्याचेही राजकारण करत आहेत, त्यांनी तसे करणे टाळावे. हा १४० कोटी देशवासियांच्या हिताचा विषय आहे; येथे स्वार्थी राजकारणाला जागा नाही.” “त्यामुळे, जे अफवा पसरवत आहेत ते देशाचे मोठे नुकसान करत आहेत,” असेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “मी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अफवांना बळी न पडण्याचे आवाहन करतो. केवळ सरकारकडून मिळणाऱ्या सातत्यपूर्ण माहितीवर विश्वास ठेवा आणि त्यानुसारच कारवाई करा. आपल्या भाषणादरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की देशभरात विविध स्वरूपात राष्ट्रउभारणीच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचीही दखल घेतली. असाच एक उपक्रम म्हणजे ‘ज्ञान भारतम सर्वेक्षण’, ज्याचा उद्देश देशभरातील हस्तलिखितांविषयी माहिती गोळा करणे हा असल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी

पंतप्रधान मोदी यांनी आवाहन करत म्हणाले की, “तुमच्याकडे एखादे हस्तलिखित किंवा त्याबद्दलची माहिती असल्यास, कृपया त्याची प्रतिमा ‘ज्ञान भारतम ॲप’वर शेअर करा,” असे सांगत प्रत्येक नोंदीशी संबंधित माहितीची पडताळणी करूनच ती नोंदवली जाते. मला आनंद आहे की आतापर्यंत हजारो हस्तलिखिते शेअर केली गेली आहेत. तसेच अधोरेखित केलेला आणखी एक उपक्रम म्हणजे ‘माय भारत’ची ‘बजेट क्वेस्ट’.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, देशभरातील तरुणांना अर्थसंकल्पीय प्रक्रिया आणि धोरणनिर्मितीशी जोडणे हा याचा उद्देश होता, असे स्पष्ट करत “देशभरातील सुमारे १२ लाख तरुणांनी या प्रश्नमंजुषेत भाग घेतला. प्रश्नमंजुषेनंतर, निबंध स्पर्धेसाठी अंदाजे १,६०,००० स्पर्धकांची निवड करण्यात आली. मला यापैकी काही निबंध वाचण्याची संधीही मिळाली. ते निबंध माझ्या तरुण मित्रांची देशाच्या विकासात योगदान देण्याची उत्सुकता दर्शवतात.” असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा एक भाग भारताच्या अलीकडच्या काळातील क्रीडा कामगिरीसाठीही समर्पित केला.

२०-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेसंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा भारताने टी-२० विश्वचषकात ऐतिहासिक विजय मिळवला, तेव्हा देशभरात आनंदाची लाट पसरली, आपल्या संघाच्या या दणदणीत यशाचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस, कर्नाटकातील हुबळी येथे एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. हा सामना जिंकून जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने रणजी करंडक आपल्या नावावर केला. हे अत्यंत आनंददायक आहे की, जवळपास सात दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर संघाने आपले पहिले रणजी करंडक विजेतेपद पटकावले.”

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरच्या या यशामुळे अनेक तरुणांना खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच, जम्मू आणि काश्मीरच्या लोकांमध्ये खेळाबद्दल “प्रचंड आवड” असल्याचेही सांगितले.

“मला आनंद आहे की आता हे प्रमुख क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनत आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गुलमर्गने खेलो इंडिया हिवाळी खेळांचे यजमान म्हणून आधीच स्वतःची ओळख निर्माण केली आहे. फुटबॉलसारखे खेळही तेथील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मला आशा आहे की जम्मू आणि काश्मीरच्या खेळाडूंची ही विजयी घोडदौड भविष्यातही अशीच सुरू राहील.

Exit mobile version