Tag Archives: prime minister

राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप, माझा फोन टॅप करत आहेत माझ्या आरोपांचे सर्व पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी असा आरोप केला की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा फोन टॅप करत आहेत’. इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनीथिंग’ (Ask Me Anything) सत्रादरम्यान ते म्हणाले, “माझ्या सर्व आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत, जो पंतप्रधान टॅप करत आहेत.” आपला फोन टॅप केला जात असल्याबाबत आपल्याला इतरही अनेक …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, खिशातून राज्यघटना काढतात… लोकशाही आपली वैयक्तिक मालमत्ता समजतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी काही नेत्यांवर आरोप केला की, हे नेते राज्यघटना आणि लोकशाहीला आपली वैयक्तिक मालमत्ता समजतात आणि सत्तेत नसतानाही त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा ‘हक्क गाजवण्याचा’ (entitlement) भाव दिसून येतो. ‘इंडिया टुडे ग्रुप’च्या ‘किसान तक भारत ॲग्रिकल्चर कॉन्फरन्स २०२६’ मध्ये बोलताना मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री …

Read More »

सोनिया गांधी यांचे मत, मोदी यांना उच्चभ्रू वर्गाबद्दल अस्वस्थता वाटते 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' आत्मचरित्रात्म पुस्तकात व्यक्त केले मत

आपल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या आत्मचरित्रात, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलचे आपले मत मांडले आहे. यात त्यांनी मोदींच्या विचारसरणीवर टीका केली असली, तरी त्याच वेळी त्यांनी हेही मान्य केले आहे की, मोदी एका “वंचित पार्श्वभूमीतून” आले आहेत …

Read More »

राहुल गांधी यांची घोषणा, ज्ञानेश कुमार, मोदी, अमित शाह यांच्यावर कारवाई करणार इंडिया आघाडी लोकशाही संपू देणार नाही

‘इंडिया’ (INDIA) आघाडी देशात “लोकशाही संपू देणार नाही”. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवले जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच ज्ञानेश कुमार यांच्यावर “कारवाई केली जाईल” अशी घोषणा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज रामलीला मैदानावर आयोजित सभेत बोलताना केली. रामलीला मैदानावर एका जनसभेला संबोधित …

Read More »

दिल्लीतील महारॅलीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे ५ हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार.. १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची वोट बचाओ, देश बचाओ भव्य महारॅली..

दिल्लीच्या रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर २०२६ रोजी इंडिया आघाडीची महारॅली होत आहे. या महारॅलीत सहभागी होण्यासाठी राज्यातील, प्रमुख नेते खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे विविध सेल व विभागाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. दिल्लीतील महारॅलीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे पाच हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते …

Read More »

आयडीबीआय बँकेतील कॅनडाच्या फेअरफॅक्सला केलेली हिस्सा विक्री ठरतेय वादग्रस्त बोली लावण्याची प्रक्रिया आणि त्याचे पालन करण्यासाठी वापरलेले नियम यावरून संशय

आयडीबीआय (IDBI) बँकेतील बहुतांश हिस्सा कॅनेडियन वित्तीय सेवा समूह ‘फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्स’ला (Fairfax Financial Holdings) विकण्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या व्यवहाराचे मूल्यमापन, बोली लावण्याची प्रक्रिया आणि त्याचे पालन करण्यासाठी वापरलेले नियम यांवरून शंका व्यक्त केल्या जात आहेत. एका माध्यम अहवालात सरकारी अंतर्गत बैठकांच्या इतिवृत्ताचा हवाला दिल्यानंतर …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची घोषणा, रासायनिक उत्पादनांचे वैश्विक केंद्र बनण्याची भारताला संधी ·मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इंडिया केम २०२६’चे उद्घाटन

‘ॲडव्हान्टेज्ड भारत : ॲन इमर्जिंग ग्लोबल केमिकल हब’ या संकल्पनेवर आधारित ‘इंडिया केम २०२६’ हे प्रदर्शन उद्योग क्षेत्रातील धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक आणि उद्योजकांना एकत्र आणणारे महत्वाचे व्यासपीठ ठरत आहे. या माध्यमातून नवीन भागीदारी, गुंतवणुकीच्या संधी आणि जागतिक पुरवठा साखळ्यांमधील भारताचा सहभाग वाढविण्यास चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

राज ठाकरे यांचा इशारा, ३ ते ४ महिन्याांमध्ये देशात काहीतरी मोठी गडबड होईल मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित छायाचित्रकार गजानन दुधाळकर यांच्या डान्स ऑफ डेमोक्रसी छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटनप्रसंगी बोलत होते

पुढील तीन -चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल. येत्या काळात देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण देश रस्त्यावर येऊ शकतो असा खबळबळजनक दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्याचबरोबर पुढील काही काळ असाही येऊ शकतो की, देशाला काही काळ पंतप्रधानच …

Read More »

‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी अर्ज करण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थी, उद्योजक, नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सचा वाढता प्रतिसाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव …

Read More »

मोदी समर्थक अभिनेता अजय देवगण यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा हातोडा बांधकाम थांबविण्याची नोटीस देऊनही बांधकाम सुरुच ठेवल्याने बंगल्याचा काही भाग पाडला

काही वर्षांपूर्वी देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळण्याच्या अनुषंगाने केंद्रातील मोदी सरकारने उद्योगपती अदानी धार्जिना तीन कायदे आणण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्रातील भाजपा सरकारचा कडाडून विरोध करत सरकारचा तो प्रयत्न हाणून पाडला. त्या दरम्यानच्या काळात जवळपास २०० शेतकरी शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या गायिका रिहाना हिने भारतातील शेतकऱ्यांच्या …

Read More »