वैद्यकीय प्रवेशासाठी महत्वाची असलेल्या नीट परिक्षा २०२६ च्या पेपर लीक झाल्याने संपूर्ण देशभरातील २२ लाख तरूणांचे भविष्य वाया गेले. या प्रकाराने संपूर्ण देशभरातून एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. या परिक्षेचा पेपर फुटल्याने आता हि परिक्षा या चालू महिन्यात होणार नाही तर ती पुढील महिन्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवरील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान आणि भाजपावर टीकेचीझोड उठविली आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवरून पंतप्रधान मोदी यांना सवाल करत, वारंवार या परिक्षेचे पेपर फुटत असताना पंतप्रधान या गंभीर विषयावर गप्प का आहेत असा सवाल करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी केली.
NEET 2024:
पेपर लीक हुआ। परीक्षा रद्द नहीं हुई। मंत्री ने इस्तीफ़ा नहीं दिया। CBI ने जांच बिठाई। एक कमेटी बनी।NEET 2026:
पेपर लीक हुआ। परीक्षा रद्द हुई। मंत्री ने फिर इस्तीफ़ा नहीं दिया। CBI फिर जाँच कर रही है। एक और कमेटी बनेगी।मोदी जी, देश आपसे कुछ सवाल पूछ रहा है – जवाब…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 17, 2026
राहुल गांधी भाजपावर टीका करताना केंद्र सरकारच्या कारभारावर चांगलीच टीका केली. नीट पेपर आणि परिक्षेतील गोंधळ यांची तुलना करताना राहुल गांधी यांनी सरकारचा एक ठराविक पॅटर्न असल्याचे एक्सवरील त्यांच्या खात्यावरून निदर्शनास आणून दिले.
राहुल गांधी आपल्या एक्सवरील खात्यावर म्हणाले की, नीट २०२४ ला नीट परिक्षेचा पेपर फुटला. परिक्षा रद्द झाली नाही. मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. सीबीआय चौकशी सुरु झाली. एक समिती स्थापन करण्यात आली. एक समिती स्थापन करण्यात आली. नीट २०२६ ला पुन्हा पेपर फुटला, परिक्षा रद्द झाली. मंत्री अजूनही पदावरच आहे. त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. पुन्हा सीबीआय चौकशी सुरु झाली. आता आणखी एक समिती स्थापन केली जाईल. शिक्षण मंत्र्यांना तात्काळ मंत्री पदावरून हटविण्याची मागणीही यावेळी केली.
सीबीआयकडून पेपर फुटी प्रकरणी देशाच्या विविध भागातून काही जणांना अटक केली आहे. तसेच या पेपर फुटी प्रकरणाची पाळे-मुळे शोधण्याचा प्रयत्न सीबीआयकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे. ही परिक्षा सध्या रद्द करण्यात आली असली तरी पुढील महिन्यात ही परिक्षा होणार आहे. तोपर्यंत या परिक्षेता त्रास काही जणांना
