Marathi e-Batmya

केंद्रीय मंत्री राणे यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले

संगमेश्वरः प्रतिनिधी
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राणे यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
भाजपाचे आमदार तथा राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना संगमेश्वरमध्ये प्रवेश करण्यास पोलिसांनी मनाई केली. मात्र त्यांचे दुसरे सुपुत्र निलेश राणे हे संगमेश्वर येथे नारायण राणे यांच्यासोबत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या भाजपाच्या जनआर्शिवाद यात्रेच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर असून आज संध्याकाळी संगमेश्वरहून चिपळूणला जाणार होते. तत्पूर्वी पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सकाळपासूनच सुरु केली. त्यासाठी संगमेश्वर तालुक्याला पोलिस छावणीचे स्वरूप आले.
साधारणतः दुपारी २ वाजल्यानंतर संगमेश्वरचे पोलिस अधिक्षक नारायण राणे यांच्या भेटीला जावून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. तसेच अटक करण्यात येणार असल्याची माहिती दिली. दरम्यान नारायण राणे यांच्यासोबत असलेले भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार, प्रसाद लाड आदी सोबत होते. या दोघांनीही पोलिसांनी अटक वॉरंट दाखविण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी त्यांना अटक वॉरंट नसल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.
दरम्यान पोलिसांनी राणे यांना अटक करू नये, त्यांना पोलिसांच्या गाडीतून नेवू नये यासाठी भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयासमोर गर्दी करत काही काळ पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केला.
कार्यकर्त्यांचा रोष पाहून आणि नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असल्याने अखेर पोलिसांनी राणे यांना त्यांच्याच वाहनातून संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान काही काळ पोलिसांच्या ताफ्यासमोर भाजपा आणि राणे समर्थकांनाकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अडथळा दूर करून त्यांना पुढे नेण्यात आले.
दरम्यान विचारांची लढाई विचारांनी करावी असे आवाहन करत राणे हे केंद्रीय मंत्री असून त्यांना अशा पध्दतीने त्यांना अटक कऱणे चुकीचे असल्याचे प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी व्यक्त केली.

Exit mobile version