Marathi e-Batmya

Video: हेट स्पीचचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

मराठी ई-बातम्या टीम

काही दिवसांपूर्वी छत्तीसगड, उत्तराखंडमधील हरीद्वार आणि दिल्लीतील धर्म संसदेतील द्वेषमुलक प्रक्षोभक भाषणांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली. तसेच या धर्म संसदेप्रकरणी काही जणांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असताना आता छत्तीसगड राज्यातील आणखी द्वेषमुल प्रक्षोभक हेट स्पीच प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये खुले आम अल्पसंख्याक समाजाच्या दुकानातून कोणतेही सामान खरेदी करणार नाही अशी सामुदायिक शपथ देण्यात आल्याचे स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असून या राज्यातील सुरगुजा येथे हिदूत्ववादी लोकांनी सामुदायिक शपथ दिली असून या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सर्व लोकांना शपथ देत असल्याचा आवाज ऐकायला मिळत असून मुस्लिम समुदायाच्या कोणत्याही व्यापाऱ्याकडून कोणतीही वस्तु खरेदी करणार नाही, त्याची जमिन विक्रीला काढली असेल तर ती खरेदी करणार नाही, मुस्लिम समुदायातील कोणत्याही व्यक्तीकडे काम करणार नाही अशी शपथ देण्यात आल्याचे स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे.

याशिवाय धर्म के लिए कोन लढेंगे असा सावल केल्यानंतर हम लढेंगे असे उत्तर समुदायातून देण्यात येत आहे. उत्तर भारतातील अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात जाणीवपूर्वक द्वेषमुलक प्रचार करण्यात येत असून या अशा पध्दतीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version