Marathi e-Batmya

पुढील २४ तासात मान्सूनच्या आगमणासाठी परिस्थिती अनुकूल

देशातील नैऋत्य मौसमी वाऱ्याच्या परिस्थितीत कोणताही आज बदल झाला नसल्याने आणि मालदीव व दक्षिण अरबी समुद्रातील वाऱ्यांमधून नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा दबाव निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील २४ तासात केरळात मान्सून दाखल होण्यास वातावरण अनुकूल असल्याची माहिती पुणे वेधशाळेने आज दुपारी दिली. त्यामुळे आधीच वातावरणातील उष्म्यामुळे आणि उष्णतेच्या लाटांमुळे कासावीस झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

तर महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता पुढील पाच दिवस राहणार आहे. तर विदर्भातही वातावरणही काही काळ उष्ण राहणार आहे. या भागात ३१ मे नंतर तर काही भागात १ मे नंतर हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर आज आणि उद्या चंद्रपूर आणि वर्धा येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला.

तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई व रायगड येथे आज वातावरण उष्ण राहण्याची शक्यता आहे. तर उद्या या भागात हलक्या सरींचा पाऊस दुपारी किंवा संध्याकाळ नंतर पडणार आहे. त्यामुळे या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर तर मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, गडचिरोली, नागपूर येथे वादळी वाऱ्यासह हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील पाचही दिवस राज्यातील अनेक भागात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून ढग भरून येणार आहेत, वीजांचा कडकडाटही होणार आहे. तसेच हलक्या सरींचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

याशिवाय मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटा निर्माण होण्याचा अंदाजही राज्याच्या प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

https://x.com/ClimateImd/status/1795772200043073571

Exit mobile version