ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात किंवा स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाईन नोंदणी करू शकतात. ज्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही त्यांनी विलंब न करता २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आलेले आहे.
राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये एकूण १.७१ कोटी खातेदार संख्या असून यापैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी निविष्ठा (बियाणे, खते, औषधे इ.) प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे.
अमरावती विभागात सहाय्यक कृषी अधिकारी अजितकुमार गेजगे मोबाईल नंबर 9657109809, पुणे विभागात सहाय्यक कृषी अधिकारी संगीता ननावरे 7588509492, कोकण विभागात सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली वाडेकर 9404953518, छ. संभाजीनगर सहाय्यक कृषी अधिकारी शीतल कौदरे 9172319637, नागपूर विभागात सहाय्यक कृषी अधिकारी अजितकुमार गेजगे 9657109809, नाशिक विभागात सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली वाडेकर 9404953518 यांच्याशी फार्मर आयडी नोंदणी संदर्भात कोणतीही अडचण आल्यास वरील हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.
