Marathi e-Batmya

कर्जमाफी योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी आता २० मे पर्यंतची मुदत

मुंबई : प्रतिनिधी

छत्रपती  शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकऱ्यांना काही कारणाने अर्ज करता आले नाहीत, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता आणखी वाढवून २० मे २०१८ अशी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. १ मे ऐवजी आता २० मेपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच ३० जून २०१८ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज सहकार विभागाने प्रसिद्ध केला आहे.

 

Exit mobile version