कर्जमाफी योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी आता २० मे पर्यंतची मुदत वन टाईम सेटलमेंटसाठी ३० जून पर्यंतची मुदतवाढ

मुंबई : प्रतिनिधी

छत्रपती  शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकऱ्यांना काही कारणाने अर्ज करता आले नाहीत, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता आणखी वाढवून २० मे २०१८ अशी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. १ मे ऐवजी आता २० मेपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच ३० जून २०१८ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज सहकार विभागाने प्रसिद्ध केला आहे.

 

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांचे आवाहन, भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळण्यासाठी एकत्र काम करावे पुण्यात आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद–२०२६

भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाचे, सुरक्षित आणि विश्वासार्ह उत्पादन म्हणून नवी ओळख मिळवून देण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *