Marathi e-Batmya

जगावं की मरावं ? शेतक-यांनी मांडली शरद पवारांसमोर व्यथा

नाशिकः प्रतिनिधी
आमच्या हातचं पीक गेलंय… खूप नुकसान झालंय… जगावं की मरावं असा प्रश्न आमच्यासमोर आहे असे सांगतानाच सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही अशी माहिती नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी शेताच्या बांधावर गेलेल्या शरद पवार यांना शेतकऱ्यांनी कथन केली.
परतीच्या पावसामुळे राज्यात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आज इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली.
शेतक-यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या पिकाची पाहणी करत शेतक-यांची आस्थेने चौकशीही केली. यावेळी शरद पवार यांनी पावसात पिकांची नासाडी झालेल्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा जाणून घेतल्या.

Exit mobile version