Marathi e-Batmya

आता आमदारांच्या वाहन कर्जावरील व्याज सरकार भरणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यातील आमदारांच्या खाजगी वाहनावरील ड्रायव्हरच्या वेतनात वाढ करत त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदारांना नवे वाहन खरेदी करण्यासाठी ३० लाख रूपयांपर्यंतचा निधी वाढविण्यात आला असून त्यावरील व्याजाची रक्कम सरकार भरेल अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी वरील घोषणा केली.

जे जूने आमदार आहेत. त्यातील अनेकांकडे स्वतःची वाहने आहेत. मात्र जे नवे आमदार आहेत, त्यांच्याकडे स्वतःचे वाहन असालयला हवे. त्यामुळे ३० लाख रूपयांपर्यंतचा निधी त्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यापूर्वी आमदारांच्या वाहनासाठी १० लाख रूपयांपर्यंतचा निधी देण्याची तरतूद होती. त्यात आता वाढ करत हा निधी ३० लाख रूपयांपर्यंत वाढविण्यात आला असून त्यावरील व्याज राज्य सरकार भरेल असे सांगत आमदारांनी फक्त मुद्दलाची रक्कम भरायची असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Exit mobile version