Marathi e-Batmya

आदित्य ठाकरे यांचा सवाल, कंत्राटादारावर कारवाई की खोके घेऊन…

शिवसेना नेते, युवासेना अध्यक्ष,आमदार आदित्य ठाकरे यांनी मुबंई महापालिका रस्ते घोटाळा, फर्निचर घोटाळया बद्दल पालिका आयुक्तांना प्रश्न उपस्थित करत पालिका प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या सिनिडिकेट बद्दल आवाज उठवला. पालिका आयुक्तानी कोणती कारवाई केली असा जाब विचारला आहे.

आदित्या ठाकरे यांनी आज दादर येथील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत पालिका आयुक्तांना जाब विचारत मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, गेले १० ते १२ महिने आम्ही रस्त्यांचा विषय मांडतोय. ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत, तिथे घोटाळे सुरु आहेत. मुंबईत ५ कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांपैकी एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मीनेशन नोटीस गेली. या नोटीशीला कंत्राटदारानं उत्तर दिलं. त्याची सुनावणी महापालिकेत या आठवड्यात होणार आहे. पण मुंबई महापालिकेकडून जाहिर करण्यात आलेल्या ६ हजार कोटींच्या कामाचे काय असा सवाल करत कामे अपूर्ण राहिल्याबद्दल काय कारवाई केली असा सवाल केला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या सुनावणीनंतर कंत्राटदारावर कारवाई होते की खोके घेऊन कारवाई थांबवली जाते. हे आम्हाला बघायचंय. मुंबईत रस्त्याची कामे १ ऑक्टोबर ते ३१ मे पर्यंत पूर्ण होतात. मुंबईत एकाही रस्ते कामाला सुरुवात नाही. अडीच हजार कोटींची कामे तशीच्या तशी पडून आहेत असा आरोपही केला.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, ट्रॅफिक पोलिसांच्या एनओसी न मिळाल्याचे कारण दाखवून रस्ते कामे रखडवली जातायत. मोठा गाजावाजा करुन सहा हजार कोटीच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला पण ती कामेही पडूनच आहेत असा आरोपही केला.

Exit mobile version