Marathi e-Batmya

दिशा सालियन प्रकरणी पोलिस चौकशीला गेल्यानंतर नितेश राणेंनी केले “हे” ट्विट

दिशा सालियन प्रकरणी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिशाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांना चौकशीसाठी आज बोलावले. तेव्हा नितेश राणे यांनी स्वत: ड्रायव्हिंग करत एकाच गाडीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे हे पोलिस स्टेशनला पोहचले. त्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत अप्रत्यक्ष ठाकरे सरकारलाच इशारा दिला.

मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या जुहू येथील घराच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावल्यानंत राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियन हिच्या मृत्यू अगोदर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच या घटना घडताना महाविकास आघाडीतील एक मंत्री तेथे उपस्थित होता असे सांगत याप्रकरणात अप्रत्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केला.

त्यानंतर भाजपा आमदार आणि नारायणे राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनीही ट्विट करत दिशा सालियन मृत्यू प्रकरणी काही आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात महापौर किशोरी पेडणेकर आणि दिशाचे कुटुंबियाने महिला आयोगाकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत महिला आयोगाने राणे पिता-पुत्रांच्या विरोधात कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच सालियन कुटुंबियानेही मालवणी पोलिसात तक्रार दाखल केली.

त्यावरून राणे पिता-पुत्रांच्या विरोधात मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होताच राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयानेही राणेंना दिलासा देत १० मार्च पर्यत अटक न करण्याचे आदेश देत संरक्षण दिले. त्यानंतर आज राणेंना आज पोलिसांनी चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले. त्यानुसार राणे पिता-पुत्र हे मालवणी पोलिस ठाण्यात हजर झाले.

राणे यांनी चौकशी दरम्यान दिशा सालियनच्या मृत्यूशी संबधित काही पुरावे पोलिसांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version