Marathi e-Batmya

“हनुमान चालिसा”ने घड़विली राणा दांम्पत्यांना ६ मे पर्यंत कोठडी

अजाण भोंग्यावरून महाविकास आघाडी सरकारने स्विकारलेल्या धोरणाचा विरोध म्हणून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती व आमदार रवि राणा यांनी हिंदूत्वाचे महत्व पटवून देण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर जावून हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे आव्हान शिवसेनेला दिले. मात्र हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबईत आलेल्या राणा दांम्पत्याला त्यांच्याच खार निवासस्थानातून बाहेर पडता आले नाही. उलट त्यांना हनुमान चालिसामुळे दोन धार्मिक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ६ मे पर्यत अर्थात१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पाठोपाठ भाजपा समर्थक राणा दांम्पत्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करायला सुरुवात केली. मात्र दोन्ही दांम्पत्याला चांगलेच महागात पडले. काल खार पोलिसांनी अटक करण्यात आल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना वांद्रे येथील सुट्टीकालीन महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने या दोघा पती पत्नीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राणा दांम्पत्यावर १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. तसेच या दोघांवरील याचिकेवरील सुनावनी २९ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान मया दोघांकडून जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु तो न्यायालयाकडून त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.  त्यामुळे या दोघांना आता उद्या न्यायालयाच्या दैंनदिन कामाकाजावेळी पुन्हा जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता रवी राणा यांना आर्थर रोड तुरूंगात ठेवण्यात येणार आहे तर नवनीत राणा भायखळा कारागृहात रवानगी करण्यात आली.

राणा दांम्पत्यावर दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाबरोबरच, धार्मिक कारणावरून दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे व एकोप्याला बाधक कृती केल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दांपत्याच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.

आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर २७ तारखेला आमचे लेखी म्हणणे मांडण्यासाठी सांगितले आहे. यावर २९ तारखेला सुनावणी होणार आहे. तसेच यामध्ये १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

खार पोलिसांनी नवनीत आणि रवी राणा यांच्या तक्रारीवरून दुसऱ्या बाजूने एफआयआर नोंदवल्यानंतर, पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध ३५३ आयपीसीचा आरोप म्हणून दुसरी एफआयआर नोंदवली असल्याचे दिसते असे नवनीत आणि रवी राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी सांगितले.

Exit mobile version