Marathi e-Batmya

राज ठाकरे मनसैनिकांना म्हणाले, वडा टाकला की तळूनच बाहेर आला पाहिजे …

राज्यात खऱ्या अर्थाने फक्त तीनच राजकिय पक्ष स्थापन झाले. पहिला जनसंघ दुसरी शिवसेना आणि तिसरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आज जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश दिसतय ना ते यश काही आजचे नाही. त्यांचा सर्वात आधी पहिला पहिला पक्ष स्थापन झाला तो जनसंघ आणि त्यानंतरचा भाजपा. पण आज जे काही यश मिळालय त्यासाठी असंख्य कार्यकर्त्ये, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी सारखे कार्यकर्त्ये आले. त्यांनी केलेल्या कामामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेचे यश पहात आहेत. पण आजकाल प्रत्येकाला वाटतं की वडा टाकला की तो तळून बाहेर आला पाहिजे इतक्या फास्टफूड लेव्हला आल्या आहेत. परंतु राजकारणात टीकायचे असेल तर संयम हा असायला हवा असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले.

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे हे बोलत होते.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, इथे जमलेले असंख्य तरूण-तरूणी मनसेत आहेत. ते सर्वजण माझ्या चढत्या आणि उतरत्या काळात सोबत आजही राहिले आहेत. माझ्या राजकिय प्रवासात चढत्या गोष्टी फार कमी लागल्या. पण उतरत्या गोष्टींचा काळच जास्त पाहिला. या उतरत्या काळातही आपण सर्वजण माझ्यासोबत राहिलात विश्वास दाखविलात. पण राजकारणात संयम फार महत्वाचा आहे असे सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार हे आज जरी वेगळे झाल्याचे सांगत असले तरी खऱ्या अर्थाने ते आतून एकच आहेत. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही जो निवडूण येण्याची क्षमता असलेला जो उमेदवार असतो त्याला सोबत घेतात आणि त्याला पक्षाचं तिकीट देतात. दोन शरद पवार यांना मिळाले, तीन अजित पवार यांना मिळाले आणि म्हणतात पक्ष बांधला म्हणून आमचे आमदार-खासदार निवडूण आले. परंतु यांनी कधी पक्षाची स्थापना करून तो बांधला नाही अशी टीका करत ते दोघेही आतून एकच आहेत अशी टीकाही यावेळी केली.

मनसैनिकांना आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले, तुमच्यातील काहीजण आमदार होतील, खासदार होतील नगरसेवकही बनतील. ते यश मी तुम्हाला मिळवून दाखविणारच अशी ग्वाही देत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांचा १३ दिवसांच सरकार आलं, नंतर साडेतेरा महिन्याचं सरकार आलं. आणि त्यानंतर साडेचार वर्षाचं सरकार आलं व आता भाजपाचं सरकार असलेले आपण पाहतोच आहे. जनसंघात आणि भाजपात आपण मोठी झालेली माणसं पहात आहोत. तुम्ही पाहिलं असेल की कोणालाही राजकिय पार्श्वभूमी नाही की, कुणीही राजकारणात आधीपासून होतं. पण त्यांनी संयम राखला म्हणून आज ते यश पहात आहेत.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आजकाल प्रत्येक गोष्ट सोशल मिडीयावर टाकली जात आहे. बरं सोशल मिडीयावर फक्त दुसऱ्यांचीच नव्हे तर माझेही व्हिडिओ आपल्या कार्यकर्त्यांकडून टाकली जातात. मध्यंतरी एकाने माझा एक व्हिडीओ टाकला. मी गाडीतून आलोय आणि गाडीतून उतरतोय आणि पाठीमागे आवाज कसला तर आारारारा चा आवाज.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात दसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरण्याची फॅशन सुरु आहे. पण मला माझीच पोरं कड्यावर घेऊन फिरायची आहेत. इतका दम आहे माझ्यात. मला इथं जमलेल्या कार्यकर्त्यांना, निवडूण आणून मोठं करायचं आहे असेही सांगितलं.

राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र एकसंघ राहु नयये यासाठी जाती जातीचे विष पेरले जाते. परवा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जरांगे पाटील यांना आंदोलन सुरु केलं. मी गेलो होतो. तेव्हा मी जरांगे हेच सांगितलं की हे होऊ शकत नाही, होवूच नये असे मी म्हणत नाही. पण टेक्नीकल लेव्हला हे होऊ शकत नाही. आज तसचं झालं. महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला शिक्षण आणि रोजगार देण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. पण त्या गोष्टीसाठी परराज्यातील तरूण येथे येणार आणि आपली पोरं जातीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन करत राहणार. याचा विचार व्हायला पाहिजे. मराठा आरक्षणासारखा प्रश्न फक्त एकट्या महाराष्ट्रात नाही. तर तो सबंध देशातील राज्यांमध्ये आहे. तेथील प्रत्येक एका जातीला हे असे रोजगाराचे आणि शिक्षणाचे प्रश्न पडतात. मग जी गोष्ट सर्वोच्च न्यायालयातून होत नाही. त्या गोष्टींवर सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून भूलथापा मारल्या जातात. या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहनही केले.

Exit mobile version